श्रींच्या स्वागतासाठी भाविकांच्या महासागर..!

श्रींच्या स्वागतासाठी भाविकांच्या महासागर..!

आधुनिक केसरी न्यूज 

दिपक सुरोसे 

शेगांव : दि.१९  धन्य आजी दिन संत दर्शनाचा । 
आनंत जन्मी चा क्षीण गेला ॥१॥
मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे।
 कदा न सोडावे चरण त्यांचे ॥
त्रिविध तापाची झाली बोळवण ।२
 देखिले चरण वैष्णवांचे ॥३॥
 एका जनार्धानी घडो त्यांचा संग।
 न व्हावा वियोग जन्मोजन्मी॥४॥
या अमृतवाणी प्रमाणेच श्री संत गजानन महाराजांची पालखी श्री क्षैत्र पंढरपूर पायदळ वारी पूर्ण करून आज दि.१९ ऑगस्ट २०२६ रोजी आपल्या घरी आपले चे स्वागत. मोठ्या उत्साहात श्रींच्या पालखीचे, वारकऱ्यांच्या स्वागत करण्यात आले
ऊन, वारा,पाऊस अंगावर झेलत विठ्ठलनामाचा गजर करीत दि.२९ जुलै रोजी श्री क्षैत्र पंढरपुरहून संत नगरी शेगांवकडे निघालेल्या श्री गजानन महाराज संस्थानच्या पालखी सोहळ्याचे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, गजानन अवलिया अवतरले जग ताराया, विठ्ठलाच्या नामाचा गजर , वीणा, टाळ-चिपळ्यांचा किणकिणाट, मृदंगांचा विशिष्ट ताल आणि घुमणारे भजनाचे स्वर अशा भक्तिमय वातावरणात श्रींच्या पालखीचे दि.१९ ऑगस्ट २०२६ रोजी संत नगरीत आगमन झाले. या वेळी आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो भाविकांनी श्रध्दा भावनेने दर्शन घेतले.

खामगांव येथील  शेवटच्या मुक्काम आटपुन दि.१९ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ५ वाजता पासुन खामगाव ते शेगांव भाविकांची गर्दी कमी झाली नाही तर जवळपास अडीच लाखांहून अधिक  महिला, पुरुष, युवक,युवती,लहान बालके भाविकांनी खामगांव ते शेगांव पायदळ वारी केली. सकाळी  कामगार मंत्री अॅड आकाश फुंडकर यांनी श्रींच्या पालखीचे पुजा करुन श्रींच्या पालखीचे दर्शन घेतले, सकाळी  ९ वाजता माऊली इंजिनिअरिंग काॅलेज येथे ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी श्रींच्या पालखीचे पूजा करुन दर्शन घेतले.सकाळी ११: वाजता श्रींच्या पालखीचे आगमन श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर आगमन होताच या ठिकाणी  श्रींच्या पालखीचे विधिवत पूजा करुन मनोभावे स्वागत केले. १२ वाजता श्रींच्या पालखीचे  स्वागत श्री गजानन वाटिका येथे संस्थानचे सेवाधारी व्यवस्थापकीय विश्वस्त याच्या हस्ते श्रींच्या पालखीचे पुजन करुन श्रींच्या पालखीचे दर्शन घेतले त्यानंतर श्रींच्या पालखीची आरती करण्यात आली यावेळी अनेक मान्यवरांनी मनोभावे दर्शन घेतले. श्री गजानन महाराजांच्या शेगांव ते श्री क्षेत्र पंढरपुर पालखी सोहळ्याचे जाणे येणे  अंतर तब्बल १३०० किलोमीटर  इतके मोठे आहे.श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे यंदा ५७ वर्ष असल्याने या सोहळ्याला वेगळेच महत्व प्राप्त झाले. या पालखी सोहळ्यात शिस्तीचे भक्तीचे वातावरण पाहावयास मिळाले पालखीत पांढऱ्याशिभ्र पोशाखातील ७०० भगव्या पताका धारी, टाळकरी वारकरी एका रांगेत चालत होते.यात तरुणांच्या सहभाग उल्लेखनीय होता. श्री गजानन महाराजाच्या नामाचा गजर ,वीणा,टाळ, चिपळ्यांचा किणकिणाट, मृदंगांंचा विशिष्ट ताल आणि घुमणारे  गजानन महाराज भजनाचे स्वर अशा भक्तिमय वातावरणात भाविक तेवढेच तल्लीन होऊन श्रीं च्या दर्शनासाठी पुढे येत होते. अग्रभागी असलेळ्या एक अश्वाला स्पर्श करुन भाविक दर्शन घेत होते. पालखी सोहळ्याच्या पारंपरिक मार्गावर स्थानिक भाविकांनी रस्त्यावर सडासंमार्जन करुन सुरेख रांगोळी काढण्यात आले श्रींच्या पालखीचे स्वागत केले. तर रस्त्यावर अनेक ठिकाणी भाविक ,कार्यकर्ते ,सामाजीक संघटना, इत्यादिंनी वारकऱ्यांसाठी चहा नाश्ता, फराळ, पाणी, अल्पोपाहाराची, महाप्रसादाची, सोय करुन मनोभावे सेवा रुजू केली होती. श्रीची पालखी श्री गजानन वाटीकेवर पोहचताच या ठिकाणी वारकऱ्यांना महाप्रसाद घेऊन श्रीची पालखी मंदिराकडे प्रस्थाना दरम्यान दुपारी १.३० वाजता श्री जगदंबा चौक, तहसिल कार्यालय, सार्वजनिक बांधकाव विभाग, रेल्वे स्टेशन, पोस्ट आफीस, पोलीस स्टेशन, पेट्रोल पंप, स्टेट बॅंक, यांनी पालखीचे स्वागत केले. पालखी अग्रसेन चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, संत गाडगेबाबा चौक,  लहुजी वस्ताद चौका येथून श्रीची पालखी संध्याकाळी ६. वाजता मंदिरात पोहचताच या ठिकाणी ज्ञानोबा तुकाराम, विठ्ठल माझ्या माझ्या, गजानन अवलिया अवतरले जग ताराया, अभंग व गोल रिगण होऊन सायंकाळी श्री विठ्ठलाची व श्रीची महाआरती करुन.श्रीच्या ५७ पायदळवारी पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली. निःशुल्क बससेवा. शेगांव ते खामगाव श्रीच्या पालखीसोबत पायदळ  वारी करणाऱ्या भाविकांसाठी शेगाव येथून खामगाव परत जाण्यासाठी खामगाव शेगाव स्कूल बस असोशिएयन, कॉलेज ऑफ मॅनेजमेंट खामगाव च्या वतीने निशुल्क बस उपलब्ध करून दिल्या गेल्या शहरातील  माऊली बस टर्मिनल,  छत्रपती संभाजी महाराज चौक गजानन सोसायटी शेगाव येथून व्यवस्था करण्यात आली याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. तुझी सेवा करीन मनोभावे भाविकांकडून सेवा.

श्रींच्या पालखीत सहभागी भाविकांच्या सेवसाठी खामगांव व शेगाव येथील भाविकांकडून सेवा दिले गेली आहे  यामध्ये महाराजा रेसिडेंसीसमोर भाविकांना  पोह्याचे वितरण, तिरुपती ग्रुपच्या वतीने करण्यात आले तर हनुमान मंदिराजवळ साबुदाणा उसळ आणि फराळाची व्यवस्था होती. लासुरा फाट्यावरील वसंत महाराज अन्नकूटी परिवाराच्या वतीने औषध, चहा, नाश्त्याची तर सामान्य रुग्णालय प्रशासनाकडूनही भाविकांसाठी औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे तर खामगाव ते शेगाव या मार्गावर ठिकठिकाणी पाणी ,चहा, नाश्ता, फराळ, महाप्रसादाचे वितरण करण्यात आले आहे.

भाविकांसाठी अतिरिक्त बस सेवा.
खामगाव ते शेगाव पायी येणाऱ्या भक्तानां परत जाण्या  येण्या करीता दरम्यान भक्तांची गर्दी पाहता एस टी महामंडळाच्या वतीने जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली यामध्ये शेगाव आगाराच्या वतीने अतिरिक्त बसेस बुलडाणा, चिखली, खामगाव, मेहकर,जळगाव जामोद, शेगाव, मलकापूर,.इत्यादी.
शहरात भाविकांच्या महासागर... 

खामगांव-शेगांव मार्ग श्रींच्या भक्तांच्या गर्दीने एक झाली गेल्या दहा वर्षांपासून खामगांव ते शेगांव १७ कि. मी. पायदळ वारीत भाविकांची संख्या कमी झाली नाही  अधिक अधिक वाढ होत आहे या वर्षी जवळपास अडीच लाखांहून अधिक भाविकांनी खामगांव शेगांव पायदल वारी करुन श्री गजानन महाराज मदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले.श्रींच्या महाप्रसाद, दर्शन  श्री गजानन वाटिका या ठिकाणी व श्रींच्या मंदिर परिसरातील महाप्रसाद या दोन्ही ठिकाणी एक लाखाहून अधिक  भाविकांनी महाप्रसाद लाभ घेतला.श्रींच्या समाधी दर्शनासाठी ३ तास तर श्रीमुख दर्शनासाठी १ तास वेळ लागत आहे.

खामगांव शेगांव पालखी मार्गवर  गर्दित कोणताही अनुचीत प्रकार घडु नये म्हणुन अपर पोलीस अधीक्षक खामगांव यांच्या मार्गदर्शनाखाली खामगांव, शेगांव शहरात एकुण ५०० पोलीस कर्मचारी, अधिकारी ठिकठिकाणी चौखबंदोबस्त लावन्यात आला होता तर वाहनांमुळे भाविकांला त्रास होऊ नये या करीता वाहनांना शहरात बंदि करण्यात येऊन शहरा बाहेरुन वाहने पुढे पाठविण्यात आली.

खामगाव ते शेगाव पायदळ वारी मध्ये 
भाविकांची संख्या दरवर्षी वाढत आहे...
श्री संत गजानन महाराजांच्या पंढरपूरहून परतीच्या पालखी सोहळ्यादरम्यान, खामगाव ते शेगाव या अंतिम टप्प्यात अडीच लाखांहून अधिक भाविकांनी अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पायदळ वारीत सहभाग घेतला. "गण गण गणात बोते" च्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण मार्ग दुमदुमून गेला होता.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

आरोग्य कर्मचाऱ्यांचे धाडस! सोनी PHC मध्ये अजगराला दिले जीवनदान  आरोग्य कर्मचाऱ्यांचे धाडस! सोनी PHC मध्ये अजगराला दिले जीवनदान 
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया : रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या देवदूतांनी आता एका मूक प्राण्यालाही जीवनदान दिले आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील...
दुर्गामाता मंदिरातील दोन लाख रुपये किमतीच्या चांदीच्या मुकुटाची दिवसाढवळ्या चोरी..!
श्रींच्या स्वागतासाठी भाविकांच्या महासागर..!
देशातील हवा बदलली, भाजपाकडे मुद्दाच नाही म्हणून वंदे मातरम वरून हिंदू-मुस्लीम करण्याचा अघोरी डाव, पण ‘मोहब्बत की दुकान’ हाच काँग्रेसचा मार्ग : हर्षवर्धन सपकाळ
शिवणी जामगा येथे शेती नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या               
बाल कीर्तनकाराच्या दमदार निरूपणाने हरिनाम सप्ताहाचा पहिल्याच दिवशी भक्तीचा तुफान रंग
ग्रामीण भागातही जाणवत आहे झाडांची कमतरता; बच्चेकंपनीने गॅलरीत झोके बांधून लुटला नागपंचमीचा आनंद