गावच्या चर्चेने पतीच्या मृत्यूचे खापर प्रियकरावर;सिडीआरने पत्नीचाही ‘मुखवटा’ उतरवला..!

गावच्या चर्चेने पतीच्या मृत्यूचे खापर प्रियकरावर;सिडीआरने पत्नीचाही ‘मुखवटा’ उतरवला..!

आधुनिक केसरी न्यूज 

 अमोल शिंदे

भोकरदन : पतीचा मृत्यू... गावात उलटसुलट चर्चांना उधाण... संशयाची बोटे पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराकडे... त्यानंतर पतीच्या मृत्यूचे खापर प्रियकरावर फोडत पत्नीनेच पोलिसांत तक्रार दाखल केली.मात्र, तपासाची चक्रे फिरली आणि प्रकरणाचे चित्रच पालटले सीडीआर  तपास नातेवाईकांचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संशयाची सुई तक्रारदार पत्नीपर्यंत पोहोचली.अखेर अनिता कैलास मिरकर हिलाच पोलिसांनी सहआरोपी करत अटक केली.अलापूर येथील कैलास विश्वनाथ मिरकर (४५) यांनी दि. ३० ते ३१ जुलैदरम्यान शेतात विषारी औषध प्राशन करून जीवन संपविले.घटनेनंतर अनिता मिरकर आणि साबेर शाह सादिक शाह यांच्याबाबत गावात चर्चा सुरू झाली.त्यानंतर अनिता हिने साबेर शाह याच्याविरुद्ध पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याची तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.मात्र, तपास पुढे सरकताच संशयाची दिशा बदलली आणि तक्रारदारच पोलिसांच्या तपासाच्या केंद्रस्थानी आली.

 सीडीआर  तपासला अन् तपासाची दिशाच बदलली...

तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांनी प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला.मृत कैलास यांच्या आई वत्सलाबाई मिरकर यांच्यासह नातेवाईकांचे जबाब नोंदविण्यात आले. त्यानंतर अनिता मिरकर आणि साबेर शाह यांच्या मोबाईलचा CDR तपासण्यात आला.तपासादरम्यान दोघांमध्ये जवळचे संबंध असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. कैलास यांना दोघांकडून मानसिक त्रास होत असल्याची बाबही तपासातून पुढे आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या मानसिक छळाला कंटाळूनच कैलास यांनी जीवन संपविल्याचा पोलिसांचा निष्कर्ष असल्याचे सांगण्यात आले.

‘फिर्यादी’च झाली सहआरोपी...

तपासातील पुरावे आणि नातेवाईकांच्या जबाबांनंतर प्रकरणाला निर्णायक कलाटणी मिळाली. दि. २० ऑगस्ट रोजी कैलास यांच्या मृत्यूप्रकरणी तक्रारदार अनिता मिरकर हिलाच पोलिसांनी सहआरोपी केले.तिला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

मुख्य संशयित फरार; अटकेची मागणी...

या प्रकरणातील मुख्य संशयित साबेर शाह सादिक शाह अद्याप फरार असल्याची माहिती आहे. त्याचा शोध घेऊन अटक करणे आता पोलिसांसमोरचे मोठे आव्हान आहे. त्याची चौकशी झाल्यानंतर या प्रकरणामागे नेमकी काय पार्श्वभूमी होती, आणखी कोणी सहभागी आहे का, याबाबत तपासाला महत्त्वाची दिशा मिळण्याची शक्यता आहे.मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळून त्याची सखोल चौकशी करावी,अशी मागणी मृत कैलास यांच्या नातेवाईकांकडून होत आहे.या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, हे मुख्य संशयिताच्या अटकेनंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

तक्रारीपासून अटकेपर्यंत...तपासाने बदलले संपूर्ण चित्र...

पतीच्या मृत्यूनंतर प्रियकराविरुद्ध तक्रार करणारी पत्नीच अखेर सहआरोपी ठरल्याने अलापूरसह भोकरदन तालुक्यात खळबळ उडाली आहे. आता फरार मुख्य संशयित कधी पोलिसांच्या हाती लागतो आणि त्याच्या चौकशीतून आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या प्रकरणातील आरोप व तपासातील निष्कर्ष हे पोलिसांच्या तपासावर आधारित असून,दोष सिद्ध होणे अथवा अंतिम जबाबदारी निश्चित होणे हे न्यायालयीन प्रक्रियेतच ठरेल.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

गावच्या चर्चेने पतीच्या मृत्यूचे खापर प्रियकरावर;सिडीआरने पत्नीचाही ‘मुखवटा’ उतरवला..! गावच्या चर्चेने पतीच्या मृत्यूचे खापर प्रियकरावर;सिडीआरने पत्नीचाही ‘मुखवटा’ उतरवला..!
आधुनिक केसरी न्यूज   अमोल शिंदे भोकरदन : पतीचा मृत्यू... गावात उलटसुलट चर्चांना उधाण... संशयाची बोटे पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराकडे......
खाकीला आधुनिक ‘बळ’आ.दानवेंच्या पाठपुराव्याला यश; भोकरदन-जाफ्राबादच्या चार ठाण्यांना १६.५३ कोटी मंजूर
‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाला तेच लोक विरोध करत आहेत ज्यांनी सावित्रीमाई फुलेंवर दगड व शेणाचे गोळे फेकले : कन्हैयाकुमार
21ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
विद्यार्थिनीचा पाठलाग करून फोटो व्हायरल करण्याची धमकी; जामोद येथे तरुणाविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा
मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी किशोर सोनवणे यांचे आमरण उपोषण सुरू
धावरी येथे सर्पदंशाने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू