खाकीला आधुनिक ‘बळ’आ.दानवेंच्या पाठपुराव्याला यश; भोकरदन-जाफ्राबादच्या चार ठाण्यांना १६.५३ कोटी मंजूर
On
आधुनिक केसरी न्यूज
भोकरदन : कायदा-सुव्यवस्थेचा कणा असलेल्या पोलीस यंत्रणेला आता आधुनिक सुविधांचे बळ मिळणार आहे.भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघातील भोकरदन,पारध बु., जाफ्राबाद आणि टेंभुर्णी पोलीस ठाण्यांच्या नवीन अद्ययावत इमारतींसाठी तब्बल १६ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.वाढती लोकसंख्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची गरज लक्षात घेऊन आमदार संतोष दानवे यांनी सातत्याने पाठपुरावा केला.या निधीतून पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना आधुनिक सुविधा मिळण्यासोबतच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण अधिक गतिमान होणार आहे.जनतेचे रक्षण आणि कायदा-सुव्यवस्था हेच सर्वोच्च प्राधान्य आहे. निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार दानवे यांनी आभार मानले.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
21 Aug 2026 18:54:22
आधुनिक केसरी न्यूज भोकरदन : कायदा-सुव्यवस्थेचा कणा असलेल्या पोलीस यंत्रणेला आता आधुनिक सुविधांचे बळ मिळणार आहे.भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघातील भोकरदन,पारध बु., जाफ्राबाद...

Comment List