धावरी येथे सर्पदंशाने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू 

धावरी येथे सर्पदंशाने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू 

आधुनिक केसरी न्यूज 

लोहा : तालुक्यातील धावरी येथील बेचाळीस वर्षीय शेतकरी व मोटरसायकल मेकॅनिकचे सर्पदंशाने दि. १९ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा उपचारादरम्यान निधन झाले.धावरी येथील अल्पभूधारक शेतकरी मुंजाजी बालाजी गाडेकर (बाळू पाटील) (वय ४२) हे शेतीसह इतर वेळेत कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोटरसायकल दुरुस्तीचे काम करत होते. लोह्यात त्यांचे मोटरसायकल दुरुस्तीचे दुकान आहे. दैनंदिन प्रमाणे दिवसभर लोह्यातील काम आटोपून बाळू पाटील सायंकाळी शेतात जाऊन जनावरांसाठी गवताचा भारा घेत असताना त्यांच्या पायाला विषारी सापाने दंश केला. मात्र त्यांना सापाने दंश केल्याचे लक्षात आले नाही. घरी जाऊन जेवण आटोपून ते झोपले असताना मध्य रात्री त्यांना चक्कर, मळमळ, पाय जड पडणे आदी लक्षणे जाणवू लागले त्यांनी सदरील बाब कुटुंबियांना दिली असता त्यांना तत्काळ लोहा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून पुढील उपचारासाठी नांदेडला जाण्याचा सल्ला दिला. नांदेड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर दि. २० रोजी दुपारी धावरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, चार मुली, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

21ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन 21ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर, दि. 20 : राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त 21 ऑगस्ट हा दिवस...
विद्यार्थिनीचा पाठलाग करून फोटो व्हायरल करण्याची धमकी; जामोद येथे तरुणाविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा
मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी किशोर सोनवणे यांचे आमरण उपोषण सुरू
धावरी येथे सर्पदंशाने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू 
आरोग्य कर्मचाऱ्यांचे धाडस! सोनी PHC मध्ये अजगराला दिले जीवनदान 
दुर्गामाता मंदिरातील दोन लाख रुपये किमतीच्या चांदीच्या मुकुटाची दिवसाढवळ्या चोरी..!
श्रींच्या स्वागतासाठी भाविकांच्या महासागर..!