विद्यार्थिनीचा पाठलाग करून फोटो व्हायरल करण्याची धमकी; जामोद येथे तरुणाविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा
आधुनिक केसरी न्यूज
जळगाव जा : जामोद येथील जनता विद्यालय परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा हात पकडत, बोलण्यास नकार दिल्यास तिचे फोटो फेसबुक व इन्स्टाग्रामवर व्हायरल करण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून एका तरुणाविरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिंक्य जगन्नाथ ताडे (रा. जामोद) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम 74, 75, 78, 351(3), 296 तसेच पॉक्सो कायद्यातील कलम 8 व 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 13 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वाजेपासून ते दि. 19 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेपर्यंतच्या कालावधीत आरोपीने संबंधित विद्यार्थिनीचा पाठलाग केला. तसेच कथितरित्या वाईट उद्देशाने तिचा हात पकडून, "माझ्यासोबत बोलली नाहीस तर तुझे फोटो फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल करेल," अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.
या प्रकरणी विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या तोंडी तक्रारीवरून दि. 19 ऑगस्ट रोजी रात्री 10.29 वाजता जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नागेश मोहोड यांच्याकडे सोपविण्यात आला असून, पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांकडून या प्रकरणातील आरोपांची चौकशी सुरू असून, तपासाअंती पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List