नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्री भुकंपाचे सौम्य धक्के 

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्री भुकंपाचे सौम्य धक्के 

आधुनिक केसरी न्यूज 

 बालाजी वैजळे 

नांदेड : नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात भुकंपाचे चार सौम्य धक्के मध्यरात्री जाणवले असून कोणतीही जिवित हानी झाली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. भुकंपाचे केंद्र बिंदू हिंगोली जिल्ह्यातील शिरली या गावात असून  रिस्टर सकेलर त्यांची तीव्रता ४.६, ३.९, ३.६ इतकी आहे. दरम्यान दिवसभरात आणखी धक्के जाणवार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यामधून 9 जुलै 2026 रोजी मध्यरात्री 1 वाजून 37 मी., 2 वाजून 15 मिनिटांनी व 2 वाजून 17 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली आहे. 
अधिकृतरित्या दिलेल्या वृत्तानुसार या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर अनुक्रमे 4.6, 3.6 व 3.9 अशी नोंदविण्यात आलेली आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरली या गावात असून या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली आहे. 

सदर भूकंपाचे धक्के हे मध्यरात्री जाणवले आहेत. धक्के बसले तेंव्हा बरेच लोक झोपेत होते. एकापाठोपाठ एक असे दोन धक्के जाणवले असल्यामुळे सकाळपर्यंत अजून धक्के बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच भूकंपाची पूर्वकल्पना देणे शक्य नसल्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. भूकंपाचे धक्के जाणवताच घराबाहेर पडून मोकळ्या जागेत जमावे. असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पहिला धक्का पहाटे १ वाजून ३७ मिनिटांनी सिर्ली-पांग्रा शिंदे गाव परिसरात जाणवला असून ४.६ रिश्टर स्केल त्यांची तीव्रता आहे. त्यांची खोली जमिनीखाली १० किलोमीटर इतकी होती. या धक्क्यामुळे नागरिक घाबरून घराबाहेर आले. दुसरा धक्का पहाटे २ वाजून १५ मिनिटांनी जाणवला काकडधाबा गावाच्या परिसरात ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा धक्का बसला. या धक्क्याची खोली देखील जमिनीखाली १० किमी होती. तिसरा धक्का पहाटे २ वाजून १७ मिनिटांनी जाणवला. दुसऱ्या धक्क्यानंतर अवघ्या दोनच मिनिटांत पुन्हा काकडधाबा परिसरात ३.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा तिसरा धक्का नोंदवला गेला.
चौथा धक्का पहाटे ३ वाजून २३ मिनिटांला जाणवला.

सव्वातीनच्या सुमारास काकडधाबा गावातच ४.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा चौथा धक्का बसला. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, कळमनुरी आणि वसमत या तालुक्यांमध्ये गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने भूगर्भातून गूढ आवाज येणे आणि सौम्य धक्के बसण्याचे सत्र सुरू आहे. आतापर्यंत या भागात ३७ पेक्षा जास्त वेळा अशा सौम्य धक्क्यांची नोंद झाली आहे. मात्र आज मध्यरात्री लागोपाठ आलेल्या चार धक्क्यांमुळे परिसरात चिंतेचे वातावरण आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी मध्यरात्रीनंतर अवघ्या दोन तासांच्या कालावधीत एकापाठोपाठ एक असे भूकंपाचे चार सौम्य धक्के बसले. भूगर्भातील या अचानक झालेल्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मध्यरात्री ज्या नागरीकांना भुकंपाचे धक्के असल्याची जाणीव झाली. त्या अनेक नागरीकांनी घरातून मोकळ्या मैदानात धाव घेतली आहे. नांदेड शहर व ग्रामीण भागातील नागरीकांनी एकमेकांना मोबाइलवरुन भुकंपाची माहिती देऊन झोपेतून जागे केले आहे. या भुकंपाची अधिक माहिती एम जी एम विज्ञान केंद्रा'चे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली असून भूकंपाचे धक्के असल्याची अधिकृत माहिती दिली आहे.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रातून युवक सक्षम व आत्मनिर्भर बनणार : आमदार देवतळे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रातून युवक सक्षम व आत्मनिर्भर बनणार : आमदार देवतळे
आधुनिक केसरी न्यूज  वरोडा : वरोडा भद्रावती विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे युवा व तडफदार आमदार करण देवतळे यांनी आपल्या क्षेत्रात विकासात्मक...
गावच्या चर्चेने पतीच्या मृत्यूचे खापर प्रियकरावर;सिडीआरने पत्नीचाही ‘मुखवटा’ उतरवला..!
खाकीला आधुनिक ‘बळ’आ.दानवेंच्या पाठपुराव्याला यश; भोकरदन-जाफ्राबादच्या चार ठाण्यांना १६.५३ कोटी मंजूर
‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाला तेच लोक विरोध करत आहेत ज्यांनी सावित्रीमाई फुलेंवर दगड व शेणाचे गोळे फेकले : कन्हैयाकुमार
21ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
विद्यार्थिनीचा पाठलाग करून फोटो व्हायरल करण्याची धमकी; जामोद येथे तरुणाविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा
मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी किशोर सोनवणे यांचे आमरण उपोषण सुरू