बाफना येथील तीन दुकाने शाॅट सर्किटमुळे खाक..!

बाफना येथील तीन दुकाने शाॅट सर्किटमुळे खाक..!

आधुनिक केसरी न्यूज 

नांदेड : शहरातील बाफना येथील तीन दुकाने आगीत जळून खाक झाली असून चार दुकानांना वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. सदरील आगीची घटना १२ जून रोजी रात्री ११ वाजता घडली आहे. नांदेड शहरातील बाफना येथील गॅरेज येथील दुकानांना आग लागल्याची माहिती अब्दुल समी यांनी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे प्रमुख केरोजी दासरे यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी एम एच २६ सी एच ३०७१ क्रमांकाच्या वाहनांसह कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी आग मोठी असल्याचे कळविताच तातडीने एम एच २६ सी एच ०४८५ क्रमांकाच्या अग्नी बंब व कर्मचारी यांना घटनास्थळी पाठविले. दोन्ही वाॅटर टेंडरचे सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. सदरील आगीत महमंद सिद्दिकी यांचे एसी कार रिपेअर सेंटर, शेख हफीज यांचे कार डेकोर रिपेअरचे साहित्य व गॅस वेल्डिंग मशीन जळून नष्ट झाले. महंमद अमिनोदिन बॅटरी यांचे चार्जिंग व लाॅक रिपेअर सेंटर जळाले. यात मोठ्या प्रमाणात साहित्य जळून नष्ट झाले. सदरील आग ही शाॅट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीच्या तावडीतून चार दुकानांना वाचविण्यात यश मिळाले आहे. सदरील कारवाई अग्निशमन दलाचे प्रमुख केरोजी दासरे, अग्निशमन दलाचे जवान सुर्यवंशी, कदम, धुळगंडे, टारपे, नरवाडे, लांडगे, ताटे यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

बाफना येथील तीन दुकाने शाॅट सर्किटमुळे खाक..! बाफना येथील तीन दुकाने शाॅट सर्किटमुळे खाक..!
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : शहरातील बाफना येथील तीन दुकाने आगीत जळून खाक झाली असून चार दुकानांना वाचविण्यात अग्निशमन दलाला...
बाबरगाव फाट्याजवळ भीषण अपघात; ट्रक व स्कुटीच्या धडकेत तिघांचा मृत्यू
घराचा स्लॅब भरताना तरुणाचा तोल जाऊन पडून मृत्यू; पैठण तालुक्यातील पाचोड येथील दुर्दैवी घटना
चंद्रपूर मनपा मध्ये गटनेता हटाव मोहीम तीव्र; काँग्रेसच्या दोन गटात धोबीपछाड
रॉयल लॉज वर पोलीसांचा छापा वेश्या व्यवसायाचा पर्दापाश
बोट उलटल्याने दोन तरुण बुडाले गोंदिया जिल्ह्यातील घटना
शेततळ्यात बुडून १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू ; अंबड तालुक्यातील माळेवाडी शिवारातील धक्कादायक घटना