गुणात्मक,संख्यात्मक वाढीसाठी प्रयत्न करा; विभागप्रमुखांच्या बैठकीत मा.कुलगुरुंचे आवाहन

प्राचार्य, विभागप्रमुखांची बैठक संपन्न

गुणात्मक,संख्यात्मक वाढीसाठी प्रयत्न करा; विभागप्रमुखांच्या बैठकीत मा.कुलगुरुंचे आवाहन

आधुनिक केसरी न्यूज 

छत्रपती संभाजीनगर, दि.१६ : येत्या शैक्षणिक वर्षात सर्व विभागांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे. तसेच सर्व प्राध्यापकांनी शोधनिबंध व संशोधन प्रकल्पांचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व पदव्यूत्तर विभागप्रमुखांची बैठक मंगळवारी (दि.१६) दुपारी महात्मा फुले सभागृहात घेण्यात आली. यावेळी मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी संबोधित केले. प्रकुलगुरू डॉ.प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांच्यासह सर्व अधिष्ठाता, संवैधानिक अधिकारी यांची बैठकीस उपस्थिती होती. विद्यापीठातील पदव्यूत्तर विभाग उन्हाळी सुट्टीनंतर १५ जूनपासून सुरु झाले. सर्व विभागात२ ते २८ जून या काळात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या संदर्भात विभागप्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी प्रास्ताविकात ’एज्युकेशन एक्सपो’च्या यशस्वीतेसाठी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व कर्मचा-यांनी उत्कृष्ट प्रयत्न केल्याचबद्दल अभिनंदन केले. तर प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते म्हणाले, सन २०२६-२७ या वर्षात शैक्षणिक वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करण्यात येणार आहे. मा.कुलगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रमांची रचना, परीक्षा व सर्व प्रकारचे नियोजन करण्यात येणार आहे. यावेळी मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, विद्यापीठ मुख्य परिसरातील ४५ विभाग व धाराशिव उपपरिसरातील ० विभाग अशा सर्वच ठिकाणी पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रत्येक अभ्यासक्रमांस किमान २० प्रवेश होणे गरजेचे आहे. ’एईडीपी’चे ९ अभ्यासक्रम सुरु करण्यात आले असून प्रत्येक ठिकाणी ’प्रोफेसर ऑफ प्रॅक्टीस’ घेण्यात येईल. तसेच अ‍ॅडजंक्ट प्रोफेसर, व्हिजीटींग प्रोफेसरची पदे भरण्यात येतील. सर्व प्राध्यापक, विभागप्रमुखांनी व कर्मचा-यांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश वसतीगृह प्रवेश यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. प्राध्यापकांची पदोन्नती यासह सर्व विषय मार्गी लावले आहेत. शिक्षकांनी मातृसंस्थेसाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे आवाहनही मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी केले. सकाळच्या सत्रात प्राचार्यांच्या बैठकीतही मा.कुलगुरु यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील विद्यार्थी संख्या व विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती याकडे लक्ष द्यावे असे आवाहन मा. कुलगुरू यांनी केले. बैठकीसाठी उपकुलसचिव माधव वागतकर, अभिषेक कदम यांनी प्रयत्न केले. बैठकीस सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, संवैधानिक अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते.

’ क्युएस रकींग’ पुढील वर्षी

सन २०२७-२५ या शैक्षणिक वर्षात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्युएस रकिंगला आपण सामोरे जाणार आहोत. ब्रिटनस्थित क्वाक्वेरेली सायमंड्स (Quacquarelli Symonds)
क्युएस रॅकिंग ही संस्था आंतरराष्ट्रीय दर्जाचा विद्यापीठाचे रँकिंग करीत असते. यासाठी विद्यार्थी संख्या, उपस्थितीचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. तसेच प्राध्यापकांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जर्मल्समधून शोधनिबंध व संशोधनपर लेखनाचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे, असेही मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी म्हणाले.

'क्यूएस रँकिंग' म्हणजे काय

क्वाक्वेरेली सायमंड्स (Quacquarelli Symonds - QS) ही ब्रिटनमधील (युनायटेड किंगडम) एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. जी उच्च शिक्षण, विद्यापीठांचे मूल्यमापन आणि जागतिक विद्यापीठ क्रमवारी (University Rankings) यांसाठी प्रसिद्ध आहे. १९९० या वर्षी सदर संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था दरवर्षीQS World University Rankings प्रकाशित करते, ज्यामध्ये जगभरातील विद्यापीठांची शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, नियोक्त्यांमधील प्रतिष्ठा, आंतरराष्ट्रीयीकरण आणि इतर निकषांच्या आधारे क्रमवारी लावली जाते.
[QS (Quacquarelli Symonds) अधिकृत संकेतस्थळ](https://www.qs.com?utm_source=chatgpt.com)

QS या नावाचा अर्थ

Quacquarelli – संस्थापकांचे आडनाव

Symonds – संस्थेच्या सुरुवातीच्या भागीदाराचे आडनावम्हणून Quacquarelli Symonds हे कोणतेही संक्षिप्त रूप नसून दोन व्यक्तींच्या आडनावांवरून तयार झालेले संस्थेचे नाव आहे.

QS चे प्रमुख कार्य

जागतिक विद्यापीठ क्रमवारी (QS World University Rankings)

विषयनिहाय क्रमवारी (QS Subject Rankings)

पदव्युत्तर शिक्षणाविषयी मार्गदर्शन

उच्च शिक्षण क्षेत्रातील संशोधन व विश्लेषण

विद्यार्थी आणि विद्यापीठांना जोडणारे कार्यक्रम

आज QS ची क्रमवारी जगभरातील विद्यापीठांच्या प्रतिष्ठेचे एक महत्त्वाचे मापदंड मानली जाते.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

दहा हजारांची लाच स्वीकारतांना महिला महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात..! दहा हजारांची लाच स्वीकारतांना महिला महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात..!
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया : तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक (वर्ग 3) यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने...
Breking news : कर्जमाफीसाठी तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन; पत्नी शर्वरी तुपकरांनी सरकारसाठी मागितली भीक
गुणात्मक,संख्यात्मक वाढीसाठी प्रयत्न करा; विभागप्रमुखांच्या बैठकीत मा.कुलगुरुंचे आवाहन
जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक गंभीर जखमी
खांडवी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार  पक्षाच्या वतीने रास्तारोको..!
खून प्रकरणातील फरार आरोपीला भाग्यनगर पोलिसांनी पकडले 
बाफना येथील तीन दुकाने शाॅट सर्किटमुळे खाक..!