साई वृंदावन कॉलनीत आरोग्य शिबिर; घोडेले दांपत्याचा पुढाकार
On
आधुनिक केसरी न्यूज
छत्रपती संभाजीनगर, दि.७: येथील पैठण रोड भागातील साई वृंदावन कॉलनीतील सांस्कृतिक सभागृहात मणके दुखी व सांधेदुखी विषयक आरोग्य शिबिराचे आयोजन रविवारी (दि.७ ) करण्यात आले. माजी महापौर नंदकुमार घोडेले व अनिताताई घोडेले यांच्या पुढाकाराने सदर शिबिर घेण्यात आले. गुजरात मधील अहिवा डांग जिल्ह्यातील प्रख्यात वैद्य गुलाब आहिर यांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले. अत्यंत जुनाट मणके दुखी व सांधे दुखी आजाराचे निष्णात तज्ञ म्हणून ते ओळखले जातात. शिबिरात दिवसभरात १६० हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी अरविंद पटेल, विश्वनाथराव तुपे पाटील, डॉ. संजय कवडे, सुभाष वैद्य, वसंतराव वाघ, एन टी डोंगरे, राजेंद्र कवडे, गटविकास अधिकारी शिरसाळकर, काशिनाथ दापके, प्रा सचिन नवथर, चेतन डोंगरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
17 Jul 2026 13:53:40
आधुनिक केसरी नांद : हिमायतनगर पोटेड पोटा येथील एका शिक्षक गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व कार्यालयातील कर्मचारी यांच्या कामगार कंटाला गोदावरी...

Comment List