परतुर येथे पाकिस्तानी संदर्भात व्हिडिओ व्हायरल प्रकरणी किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलवर कारवाईची मागणी; सकल हिंदू समाजाचे पोलीस अधीक्षकांकडे निवेदन

परतुर येथे पाकिस्तानी संदर्भात व्हिडिओ व्हायरल प्रकरणी किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलवर कारवाईची मागणी; सकल हिंदू समाजाचे पोलीस अधीक्षकांकडे निवेदन

आधुनिक केसरी न्यूज 

जालना : परतूर तालुक्यातील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात झालेल्या कथित देशविघातक कृत्यांबाबत संबंधित शाळेचे संचालक, प्राचार्य, शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदू समाजाचे निवेदन पोलीस अधीक्षक, यांना देण्यात आले आहे.
 हिंदू समाजाने  दिलेल्या निवेदनानुसार, शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमादरम्यान काही विद्यार्थिनींनी हातात तलवारी घेऊन तसेच इस्लामिक पोशाख परिधान करून एका गाण्यावर मंचावर नृत्य सादर केले. या गाण्यातील शब्द देशविघातक असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
तसेच कार्यक्रमाच्या वेळी मंचावरील स्क्रीनवर दहशतवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुमताज कादरी याचा फोटो, आयएसआयएसशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आलेले पोस्टर तसेच पाकिस्तानच्या राष्ट्रीय ध्वजासारखा दिसणारा ध्वज दाखविण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
लहान मुलांचा वापर करून दहशतवादी संघटनांचे किंवा अतिरेकी विचारांचे उदात्तीकरण करण्यात आल्याचा आरोप करत संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. मात्र, निवेदनातील आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे अद्याप बाकी आहे. परतूर तालुक्यातील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात कथितपणे देशविघातक व दहशतवादाचे समर्थन करणारे सादरीकरण करण्यात आल्याचा आरोप करत संबंधित शाळेचे संचालक, प्राचार्य, शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जालना येथील सकल हिंदू समाजाने  जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.

निवेदनानुसार, शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात काही विद्यार्थिनींनी हातात तलवारी घेऊन व विशिष्ट पोशाख परिधान करून एका गाण्यावर नृत्य सादर केले. या गाण्यातील शब्द देशविघातक स्वरूपाचे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच मंचावरील स्क्रीनवर दहशतवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुमताज कादरी याचे छायाचित्र, आयएसआयएसशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आल

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

परतुर येथे पाकिस्तानी संदर्भात व्हिडिओ व्हायरल प्रकरणी किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलवर कारवाईची मागणी; सकल हिंदू समाजाचे पोलीस अधीक्षकांकडे निवेदन परतुर येथे पाकिस्तानी संदर्भात व्हिडिओ व्हायरल प्रकरणी किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलवर कारवाईची मागणी; सकल हिंदू समाजाचे पोलीस अधीक्षकांकडे निवेदन
आधुनिक केसरी न्यूज  जालना : परतूर तालुक्यातील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात झालेल्या कथित देशविघातक कृत्यांबाबत संबंधित शाळेचे संचालक,...
सातव्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी देवीदास फुलारी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अँटी रँगींग समिती, पथकाची स्थापना
शेतीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून; कुर्‍हाडीच्या हल्ल्यात मोठ्या भावाचा मृत्यू
अखेर दोन वर्षांची मादी बिबट जेरबंद..!
दहा हजारांची लाच स्वीकारतांना महिला महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात..!
Breking news : कर्जमाफीसाठी तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन; पत्नी शर्वरी तुपकरांनी सरकारसाठी मागितली भीक