सावरगांव माळ नसिराबाद स्मार्ट सिटीचा मार्ग मोकळा; शासन लवकरच नोटिफिकेशन काढणार!

​माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश

सावरगांव माळ नसिराबाद स्मार्ट सिटीचा मार्ग मोकळा; शासन लवकरच नोटिफिकेशन काढणार!

आधुनिक केसरी न्यूज 

बाळासाहेब भोसले

​सिंदखेडराजा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाजवळ, सावरगांव माळ (ता. सिंदखेडराजा) येथे शासनाच्या वतीने 'स्मार्ट सिटी' (नवनगर) प्रस्तावित आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री ना. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. यासाठी विविध बैठकाही घेण्यात आल्या होत्या. अखेर डॉ. खेडेकर यांच्या या अथक प्रयत्नांना मोठे यश आले आहे.

​डॉ. शशिकांत खेडेकर यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री ना. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेतली. या महत्त्वपूर्ण बैठकीदरम्यान नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव, नगर रचना संचालक श्रीमती सुलेखाताई वैजापूरकर, नगरविकास सहसचिव, तसेच नगरविकास अवर सचिव श्री. प्रसाद शिंदे यांची देखील उपस्थिती होती. या भेटीदरम्यान सावरगांव माळ - नजीराबाद स्मार्ट सिटी (नवनगर) चे अधिकृत नोटिफिकेशन (अधिसूचना) काढण्याचे स्पष्ट आश्वासन देण्यात आले आहे.
​MSRDC कडे सादर होणार पुढील प्रस्ताव शासनातर्फे हे नोटिफिकेशन निघाल्यानंतर, सदरचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी एम.डी., एम.एस.आर.डी.सी. (MSRDC) कडे सादर केला जाणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष कामाला गती मिळणार आहे. ​इंटरचेंजपासून ५ किमी परिसरात उभारणी
प्रस्तावित सावरगांव माळ - नजीराबाद स्मार्ट सिटी ही सिंदखेडराजा इंटरचेंजपासून अवघ्या ५ किलोमीटरच्या परिसरात साकारली जाणार आहे. या प्रकल्पाची पुढील कार्यवाही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती स्वतः डॉ. शशिकांत खेडेकर यांनी दिली आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे सिंदखेडराजा परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सावरगांव माळ नसिराबाद स्मार्ट सिटीचा मार्ग मोकळा; शासन लवकरच नोटिफिकेशन काढणार! सावरगांव माळ नसिराबाद स्मार्ट सिटीचा मार्ग मोकळा; शासन लवकरच नोटिफिकेशन काढणार!
आधुनिक केसरी न्यूज  बाळासाहेब भोसले ​सिंदखेडराजा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाजवळ, सावरगांव माळ (ता. सिंदखेडराजा) येथे शासनाच्या वतीने 'स्मार्ट सिटी' (नवनगर)...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भारतरत्न प्रस्तावाला विलंब का?  विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांचा एल्गार
महिला व यूवकाचा अपघात मृत्यू; भोकर म्हैसा रस्त्यावरील घटना
काँग्रेस पक्षाचा आसुड मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला..!
काँग्रेसचा आसूड मोर्चा दुसऱ्या क्रांतीची नांदी ठरेल : सपकाळ
धानोरकरांचा बाऊन्सर वडेट्टीवरांनी हायकोर्टाद्वारे टोलवला..!
वकिली पेशाला दिली समाजकार्याची जोड; उद्योजक मानसिंग पवार यांचे गौरवउद्गार