भोकरला मावेजासाठी शेतकऱ्याचे जलबुडी अंदोलन
आधुनिक केसरी न्यूज
भोकर : ता. येथील सुधा प्रकल्पाची उंची वाढवण्यासाठी त्या परिसरातील शेतकऱ्यांची अतिरिक्त जमिन भुसंपादित केली.मावेजा देण्यासाठी संबधीत विभागाने "तारीक पे तारीक" अशी भुमिका घेतल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २२) चक्क सूधा प्रकल्पात जलबुडी आंदोलन सूरू केले आहे. तालुक्यातील एकमेव सूधा प्रकल्प त्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरला आहे.प्रकल्पाची १.१० मीटर ऊंची वाढवण्यासाठी सहा गावांतील ३७.०७ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. संबंधित जमिनीचा मावेजा देण्यासाठी शासन चालढकल करून शेतकऱ्यांची थट्टा करीत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे.या बाबत तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले असता विष्णुपुरी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सी.आर.बनसोडे यांनी १० जुन २०२६ पर्यंत मावेजा देण्यात येईल असे आश्वासन दिल्याने उपोषण माघार घेण्यात आले. आश्वासनांची पूर्तता केली नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ७० टक्के मावेजा देण्यात यावा,रस्ता आणि पूलाचे बांधकाम करण्यात यावे या मागणीसाठी सोमवारी चक्क सूधा प्रकल्पात जलबुडी आंदोलन सुरू केले आहे. अंदोलनात प्रकल्पग्रस्त शेतकरी ऊतम बाभळे, अब्दुल रहिम करीम कुरेशी, तानाजी शिवेवार,शेख नईमोद्दिन हमीद मिया, प्रशांत शिवेवार, दत्ता कदम, बालाजी वनलवाड,माधव देवकर,संजय मुरगूलवाड,शंकर नवटक्के, सुर्यकांत वनलाड,गजानन नाईकवाड, शिवाजी चिलेवाड, शिवाजी हूबेवाड, बालाजी अटकलवाड यांचा समावेश आहे.
# सुधा प्रकल्पाची निर्मिती करून सिंचनाची सोय करण्यात आली हि बाब आमच्यासाठी दिलासा देणारी आहे.प्रकल्पाची उंची वाढवण्यासाठी जी जमीन संपादित करण्यात आली त्याचा मावेजा देण्यासाठी दिरंगाई केली जात आहे. त्वरित मावेजा मिळावा अन्यथा पूढिल काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल.
(ऊत्तम बाभळे, शेतकरी) आम्हाला सिंचनाची व्यवस्था केल्याने समाधानी आहोत पण दूस-या टप्प्यातील कामाचा मावेजा देण्यासाठी अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. कुणाच्या दबावाखाली येऊन आमच्या वर अन्याय करीत आहे हे समजत नाही. राजकारण बाजूला ठेवून आम्हाला न्याय देण्यात यावा.
(शेख नईमोद्दिन हमीद मिया, शेतकरी)
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List