​सूर्याटोला रेल्वे चौकीजवळ थरार: अज्ञात महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या..!

​सूर्याटोला रेल्वे चौकीजवळ थरार: अज्ञात महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या..!

आधुनिक केसरी न्यूज 

गोंदिया : रामनगर पोलीस ठाणे अतंर्गत ​सूर्याटोला येथील रेल्वे चौकीसमोर आज सकाळच्या सुमारास एका अज्ञात महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन्ही रेल्वे ट्रॅकच्या मध्यभागी हा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. ​घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला (Forensic Expert) पाचारण करण्यात आले होते. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून काही महत्त्वाचे नमुने आणि पुरावे हस्तगत केले आहेत.

​ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून तो उत्तरिय तपासणीसाठी (Post-Mortem) रुग्णालयात पाठवला आहे. मृत महिला कोण आहे आणि ती कुठली रहिवासी आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. महिलेची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे. या महिलेची हत्या कोणी आणि कोणत्या कारणासाठी केली, याचा शोध पोलीस घेत आहेत. परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्या असल्यास किंवा मृत महिलेबाबत काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील कसून तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शिवसेनेतून कृष्णा आष्टीकर यांची हकालपट्टी..! शिवसेनेतून कृष्णा आष्टीकर यांची हकालपट्टी..!
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : युवासेना उबाठा सचिव कृष्णा पाटील आष्टीकर यांची हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा शिवसेना नेते संजय राऊत...
​सूर्याटोला रेल्वे चौकीजवळ थरार: अज्ञात महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या..!
नांदेड विधान परिषद प्रधिकार निवडणूकीत भाजपाचे उमेदवार राजूरकर २५५ मतांनी विजयी..!
श्रींच्या पालखीचे पंढरपूर वारीकरीता प्रस्थान पालखी निघाली भक्तांसंगे 
खुलताबाद पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळुन बाजार सावंगी मुख्य रस्त्यावरून धिंड
आज श्रींच्या पालखीचे श्री क्षैत्र पंढरपूर  वारीकरीता प्रस्थान.शेगांवची शिस्तप्रिय पालखीत  ७०० वारीकर सहभागी
गोंदियात आंतरराज्यीय ‘पुष्पागँग’वर वन विभागाची चपराक वाहनासह तीन लाकूड तस्कर अटकेत; डोंगरगाव सहवनक्षेत्रातील धडक कारवाई