खुलताबाद पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळुन बाजार सावंगी मुख्य रस्त्यावरून धिंड
गुन्ह्यातील आरोपींला अटक करून पोलिसांनी मुख्य रस्त्यावरून त्यांची धिंड काढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली
आधुनिक केसरी न्यूज
किशोर जाधव
खुलताबाद : खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथे दि.20 शनिवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास बाजार सावंगी येथील मुख्य रस्त्यावरून आरोपींची धिंड काढण्यात आली असून बाजार सावंगी येथील गजबजलेल्या मार्केट परिसरात चहाच्या हॉटेलमध्ये थुंकण्यास विरोध केल्याने राग मनात धरून सहा जणांनी दोन सख्ख्या भावावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना ( दि.18) गुरुवारी घडली असून लाकडी दांडे व लोखंडी रॉडने करण्यात आलेल्या या हल्ल्यात दोघां भावांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेमुळे बाजार सावंगी परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली तपासा अधिकारी राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने ही घटनास्थळी भेट देत पुरावे संकलित केले याप्रकरणी संबंधित आरोपी अश्विन कारभारी नलावडे,अनिकेत गणेश नलावडे,मनोज अंकुश जाधव,आबाराव नलावडे,तसेच बबलू शेख व शुभम देविदास सराटे हे दोघे फरार असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन,तपास अधिकारी राजेश पाटील,यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार सावंगी पोलीस चौकीचे मुख्य जमादार नवनाथ कोल्हे,हे करीत आहे यादरम्यान पूर्वीही मुख्य आरोपीपैकी अनिकेत गणेश नलावडे,यांच्याविरूद्ध कलम १३७ (२) अंतर्गत दोन तसेच कलम ११८ (१) अंतर्गत एक गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे खुलताबाद पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेऊन कलम ( ३०७ ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसाकडून देण्यात आली आहे
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List