वकिली पेशाला दिली समाजकार्याची जोड; उद्योजक मानसिंग पवार यांचे गौरवउद्गार

अ‍ॅड.वसंतराव साळुंके यांचा नागरी सत्कार

वकिली पेशाला दिली समाजकार्याची जोड; उद्योजक मानसिंग पवार यांचे गौरवउद्गार

आधुनिक केसरी न्यूज

छत्रपती संभाजीनगर, दि.२२ : समाजातील शेवटच्या माणसालाही न्याय मिळाला पाहिजे याची जाणीव ठेऊन अ‍ॅड.वसंतराव साळुंके वकिली करीत पेशाला सामाजिक कार्याची जोडही दिली. यामुळेच ते पाचव्यांदा निवडून येऊ शकले, असे गौरवोद्गार उद्योजक मानसिंग पवार यांनी काढले. महाराष्ट्र-गोवा बार कॉन्सिलच्या कार्यकारणीवर अ‍ॅड.वसंतराव दिगंबरराव साळुंके यांची सलग पाचव्यांदा निवड झाली. याबद्दल नागरी सत्कार समारंभाचे आयोजन रविवारी पैठण रोडवरील ग्रॅड कल्याण सभागृहात करण्यात आले. यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, उद्योजक मानसिंग पवार, बार कॉन्सिल सदस्य अँड राजेंद्र उमाप, अ‍ॅड.वसंतराव साळुंके, मधुमती साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी पाहुण्यांचे हस्ते साळुंके दांपत्याचा स्मृतिचिन्ह, मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. मानपत्राचे वाचन आणि लेखन डॉ.संजय शिंदे यांनी केले. कर्तृत्व, दांडगा जनसंपर्क, निगर्वी स्वभाव यांच्या बळावर मुंबई-पुण्यासारख्या महानगरांमधील दिग्गजांना शह देत मराठवाडयाच्या मातीचे नाव उज्ज्वल करणारे महाराष्ट्र आणि गोवा वकीत परिषदेचे माजी चेअरमन अँड वसंतराव साळुंके यांचा पाचव्यांदा ऐतिहासिक विजय झाला आहे. १९९८ पासून सुरु असलेला हा विजयी रथ अखंडपणे पाचव्यांदा धावला. वकील परिषदेच्या इतिहासाठी हा एक सुवर्णमय किर्तिमान ठरला आहे.या निमित्त राज्यभरातून आलेल्या शेकडो वकिलांच्या हा कार्यक्रम झाला. उद्योजक मानसिंग पवार यांनी  अ‍ॅड. साळुंके यांचा वसा आणि वारसा नवीन मंडळींनी पुढे नेला पाहिजे, असे आवाहन केले. तर अ‍ॅड. वसंतराव साळुंके यांची लोकप्रियता पाहता त्यांना तहहयात सदस्य करावे, असे एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम म्हणाले.


  सत्काराला उत्तर देताना अँड.वसंतराव साळुंके अत्यंत भावुक झाले. आपल्या यशाचे रहस्य उलगडताना ते म्हणाले, ’माझ्या आयुच्यात निवडणुकीसाठी मला कधीच कोणत्याही अवघड किवा अयोग्य गोष्टी कराव्या लागल्या नाहीत. त्यामुळे मी निवडून आलो असा अहंकार माझ्या तोंडून कधीच निघाला नाही. वकिलांनी मला निवडून दिले ही कृतज्ञतेची भावना माझ्या मनात राहील.
ज्येष्ठ विधिज्ञ रमेशराव धोर्डे आणि मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी साळुंके यांच्या अविरत विजयाचे गमक उलगडताना सांगितले की, ’त्यांच्या निगर्वी स्वभाव, प्रत्येकाच्या सुख-दुखात धावून जाण्याची वृत्ती, वकिलांच्या न्याय हक्कांसाठी सदैव अग्रभागी राहणे. या व अशा अनेक गोष्टींमुख ते वकिलांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. केवळ वकिलीच नव्हे, त्यांच्या पर्यावरणप्रमाणे वृक्षारोपणाच्या ध्यासाचेही यावेळी बळीराम साळुंके यांनी कौतुक केले. अ‍ॅड. रवींद्र गोरे यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. दीपक देशमुख यांनी सूत्रसंचालन तर अ‍ॅड. सुदर्शन साळुंके यांनी आभार मानले. प्रारंभी अ‍ॅड.सुनील काळदाते,अ‍ॅड. मयूर साळुंके, अ‍ॅड. अशोक ठेळे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. कार्यक्रमास आ. विक्रम काळे, माजी आ. मोहनराव साळुंके, अरविंद गोरे, बार कौन्सिल सदस्य अ‍ॅड.राजेंद्र बागुल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वकिली पेशाला दिली समाजकार्याची जोड; उद्योजक मानसिंग पवार यांचे गौरवउद्गार वकिली पेशाला दिली समाजकार्याची जोड; उद्योजक मानसिंग पवार यांचे गौरवउद्गार
आधुनिक केसरी न्यूज छत्रपती संभाजीनगर, दि.२२ : समाजातील शेवटच्या माणसालाही न्याय मिळाला पाहिजे याची जाणीव ठेऊन अ‍ॅड.वसंतराव साळुंके वकिली करीत...
‘स्वारातीम’ विद्यापीठाचा मोठा निर्णय; २४ महाविद्यालयांतील बी.एस्सी. प्रथम वर्ष प्रवेशाला स्थगिती
भोकरला मावेजासाठी शेतकऱ्याचे जलबुडी अंदोलन
शिवसेनेतून कृष्णा आष्टीकर यांची हकालपट्टी..!
​सूर्याटोला रेल्वे चौकीजवळ थरार: अज्ञात महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या..!
नांदेड विधान परिषद प्रधिकार निवडणूकीत भाजपाचे उमेदवार राजूरकर २५५ मतांनी विजयी..!
श्रींच्या पालखीचे पंढरपूर वारीकरीता प्रस्थान पालखी निघाली भक्तांसंगे