अखेर बहूचर्चित माजी आ.गोपालदास अग्रवाल मारहाण प्रकरणाचा निकाल 

अखेर बहूचर्चित माजी आ.गोपालदास अग्रवाल मारहाण प्रकरणाचा निकाल 

आधुनिक केसरी न्यूज 

गोंदिया : 25 जून जिल्ह्यातील राजकारणात खळबळ निर्माण करणार्‍या व तब्बल 10 वर्षांपासून प्रतिक्षीत असलेल्या काँग्रेसचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर झालेल्या मारहाण प्रकरणाचा अखेर जिल्हा अपर सत्र न्यायालय क्रमांक 1 यांनी गुरुवारी 25 जून रोजी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणात भाजपचे नगरसेवक शिवकुमार शंकरलाल शर्मा आणि राहुल हेमराज श्रीवास यांना दोषी ठरवत दोघांना प्रत्येकी पाच वर्षांच्या कारावासाची तसेच 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर या प्रकरणातील अन्य चार आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी 9 एप्रिल 2016 रोजी कुडवा येथील एका हॉटेलमध्ये काँग्रेस पक्षाच्या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीदरम्यान शिव शर्मा व राहुल श्रीवास यांनी गोपालदास अग्रवाल तसेच त्यांचे पुत्र विशाल अग्रवाल यांच्यासोबत मारहाण केल्याचा आरोप होता. घटनेनंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. या प्रकरणी प्राप्त तक्रारीच्या आधारे रामनगर पोलिस ठाण्यात शिव शर्मा यांच्यासह सहा जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 120(ब), 324, 325, 294, 505, 212 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन ठाणेदार ताईतवाले यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू असताना गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 1 ए. एस. प्रतिनीधी यांनी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून अंतिम निकाल दिला. न्यायालयाने शिवकुमार शर्मा व राहुल श्रीवास यांना दोषी ठरवत प्रत्येकी पाच वर्षांच्या कारावासाची आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. तसेच या खटल्यातील उर्वरित चार आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
...

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अखेर बहूचर्चित माजी आ.गोपालदास अग्रवाल मारहाण प्रकरणाचा निकाल  अखेर बहूचर्चित माजी आ.गोपालदास अग्रवाल मारहाण प्रकरणाचा निकाल 
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया : 25 जून जिल्ह्यातील राजकारणात खळबळ निर्माण करणार्‍या व तब्बल 10 वर्षांपासून प्रतिक्षीत असलेल्या काँग्रेसचे माजी...
देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी लढाई, संविधान रक्षणाच्या लढाईत अनुसुचित जातीची भूमिका महत्वाची: हर्षवर्धन सपकाळ
गोंदियाच्या 'आरोग्य देवदूत' राजश्री भोंडे यांच्या धाडसाने धावत्या ट्रेनमध्येच सुरक्षित प्रसूती; माता-बाळ सुखरूप
सावरगांव माळ नसिराबाद स्मार्ट सिटीचा मार्ग मोकळा; शासन लवकरच नोटिफिकेशन काढणार!
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भारतरत्न प्रस्तावाला विलंब का?  विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांचा एल्गार
महिला व यूवकाचा अपघात मृत्यू; भोकर म्हैसा रस्त्यावरील घटना
काँग्रेस पक्षाचा आसुड मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला..!