गोंदियाच्या 'आरोग्य देवदूत' राजश्री भोंडे यांच्या धाडसाने धावत्या ट्रेनमध्येच सुरक्षित प्रसूती; माता-बाळ सुखरूप

गोंदियाच्या 'आरोग्य देवदूत' राजश्री भोंडे यांच्या धाडसाने धावत्या ट्रेनमध्येच सुरक्षित प्रसूती; माता-बाळ सुखरूप

आधुनिक केसरी न्यूज 

गोंदिया : कर्तव्यनिष्ठा, धैर्य आणि सेवाभाव यांचा संगम घडला की अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतही आशेचा किरण उजळतो. नागपूरहून मुंबईकडे धावणाऱ्या दुरंतो सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये घडलेली एक हृदयस्पर्शी घटना याच गोष्टीची साक्ष देणारी ठरली आहे. गोंदिया जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र काटी अंतर्गत उपकेंद्र मरारटोला येथे कार्यरत असलेल्या एएनएम आरोग्य सेविका श्रीमती राजश्री भोंडे (नेवारे) यांनी प्रसंगावधान, वैद्यकीय कौशल्य आणि अपार धैर्याच्या बळावर धावत्या रेल्वेत एका गर्भवती महिलेची सुरक्षित प्रसूती करून माता आणि नवजात बालकाचा जीव वाचवला. त्यांच्या या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत असून त्यांना 'आरोग्य देवदूत' अशी गौरवपूर्ण उपाधी मिळत आहे.

 गर्भवतीला प्रसूतीकळा अन् धावपळ

मिळालेल्या माहितीनुसार, २४ जून २०२६ रोजी सकाळच्या सुमारास नागपूर-मुंबई दुरंतो एक्सप्रेस जळगाव स्थानक ओलांडून पुढे धावत असताना ट्रेनमधील एका गर्भवती महिलेला अचानक तीव्र प्रसूतीकळा सुरू झाल्या. वेदनांची तीव्रता वाढत असल्याने तिची अवस्था चिंताजनक बनली. पुढील स्थानक येण्यास बराच अवधी असल्यामुळे तिचे नातेवाईक आणि सहप्रवासी हतबल झाले होते. रेल्वेच्या वेगाबरोबरच चिंतेचाही वेग वाढत होता.
अशा बिकट परिस्थितीत अनेकजण गोंधळून गेले असताना. त्याच डब्यात प्रवास करणाऱ्या राजश्री भोंडे यांनी परिस्थितीचे गांभीर्य क्षणात ओळखले. आरोग्य सेविकेच्या नात्याने त्यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडले 

साधनांची कमतरता; पण आत्मविश्वासाची शिदोरी

धावत्या रेल्वेत प्रसूती करणे ही अत्यंत जोखमीची बाब मानली जाते. ना आवश्यक वैद्यकीय उपकरणे, ना प्रसूती कक्ष, ना डॉक्टरांची टीम. मात्र, संकटसमयी अनुभवच सर्वात मोठे साधन ठरते. राजश्री भोंडे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळातील अनुभव, प्रशिक्षण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली. सहप्रवाशांच्या मदतीने त्यांनी महिलेसाठी आवश्यक गोपनीयता आणि सुरक्षिततेची व्यवस्था केली.
प्रसूतीची प्रक्रिया काळजीपूर्वक पार पाडत त्यांनी कोणतीही वैद्यकीय गुंतागुंत निर्माण होऊ न देता महिलेची यशस्वी प्रसूती केली. काही क्षणांपूर्वी चिंतेचे सावट असलेल्या डब्यात नवजात बालकाच्या रडण्याचा मधुर स्वर घुमला आणि वातावरणात दिलासा व आनंदाची लहर पसरली.

👉चाळीसगाव येथे वैद्यकीय यंत्रणा सज्ज

प्रसूतीनंतर तात्काळ रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला. परिस्थितीची माहिती मिळताच चाळीसगाव
रेल्वे स्थानकावर आरोग्य यंत्रणा आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली. ट्रेन स्थानकावर पोहोचताच माता आणि नवजात बालकाला १०८ रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर दोघांचीही प्रकृती स्थिर आणि समाधानकारक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
सेवाभावाचा उज्ज्वल आदर्श आजच्या धावपळीच्या युगात कर्तव्याच्या पलीकडे जाऊन समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींची
उदाहरणे दुर्मिळ होत चालली आहेत. अशा वेळी राजश्री भोंडे यांनी दाखविलेली तत्परता आणि मानवतेचा ध्यास समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. त्यांच्या कृतीमुळे केवळ एका बाळाचा जन्म सुरक्षित झाला नाही, तर आरोग्य सेवेतील संवेदनशीलतेचे आणि समर्पणाचे दर्शनही घडले.

आरोग्य विभागाकडून विशेष गौरव

राजश्री भोंडे यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत गोंदिया जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे तसेच माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. त्यांनी भोंडे यांच्या कार्याला आरोग्य विभागासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी उदाहरण असे संबोधले. धावत्या रेल्वेच्या गतीत जन्मलेले हे नवजीवन आणि त्यामागे उभे असलेले राजश्री भोंडे यांचे धैर्य, सेवाभाव व मानवी संवेदनांचा सुवर्ण अध्याय म्हणून दीर्घकाळ स्मरणात राहील. संकटाच्या अंधारात आशेचा दिवा पेटवणाऱ्या या 'आरोग्य देवदूताने' पुन्हा एकदा सिद्ध केले की, खऱ्या अर्थाने सेवा हीच सर्वश्रेष्ठ मानवता
आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी लढाई, संविधान रक्षणाच्या लढाईत अनुसुचित जातीची भूमिका महत्वाची: हर्षवर्धन सपकाळ देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी लढाई, संविधान रक्षणाच्या लढाईत अनुसुचित जातीची भूमिका महत्वाची: हर्षवर्धन सपकाळ
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : दि. २५ जून २०२६. देशात सध्या लोकशाही व संविधान धोक्यात आहे. रा. स्व. संघ व...
गोंदियाच्या 'आरोग्य देवदूत' राजश्री भोंडे यांच्या धाडसाने धावत्या ट्रेनमध्येच सुरक्षित प्रसूती; माता-बाळ सुखरूप
सावरगांव माळ नसिराबाद स्मार्ट सिटीचा मार्ग मोकळा; शासन लवकरच नोटिफिकेशन काढणार!
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भारतरत्न प्रस्तावाला विलंब का?  विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांचा एल्गार
महिला व यूवकाचा अपघात मृत्यू; भोकर म्हैसा रस्त्यावरील घटना
काँग्रेस पक्षाचा आसुड मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला..!
काँग्रेसचा आसूड मोर्चा दुसऱ्या क्रांतीची नांदी ठरेल : सपकाळ