विजेच्या धक्क्याने खेर्डा खुर्द येथील तरुणाचा मृत्यू महावितरणच्या गलथान कारभाराचा तालुक्यातील पहिला बळी..!

विजेच्या धक्क्याने खेर्डा खुर्द येथील तरुणाचा मृत्यू महावितरणच्या गलथान कारभाराचा तालुक्यातील पहिला बळी..!

आधुनिक केसरी न्यूज 

जळगाव जा : खेर्डा खुर्द तालुका जळगाव जामोद येथे विजेच्या ताणाचा  जोरदार शॉक लागून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संकेत प्रभाकर वेरुळकर, वय २० वर्षे, रा. खेर्डा खुर्द हे  दिनांक २६ जून रोजी दुपारच्या सुमारास आनंदा श्रीरंग वेरूळकर यांच्या गट नंबर ८५ वनुर शिवारातील शेतात पेरणी सुरू असताना विजेच्या खांबाच्या तानाच्या संपर्कात आल्याने त्याला जोरदार विजेचा झटका बसला. विजय वासनकर व इतर उपस्थित नागरिकांनी तातडीने त्याला जळगांव जामोद येथे उपचाराकरिता दाखल केले असता  डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

संकेत हा आर्मी भरतीची तयारी करीत होता त्याने ग्राउंड पास केले होते पुढील काही दिवसात त्याची लेखी परीक्षा होणार होती अशातच  त्याच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला व नंतर शोकाकुल वातावरणात संकेत वर अंत्यसंस्कार करण्यात आले.. जळगाव जामोद पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे महावितरणच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पावसाळ्यात लोंबकळणाऱ्या तारा, उघडे डीपी, जीर्ण पोल यामुळे जीवितहानीच्या घटना वाढत आहेत.त्यामुळे महावितरण च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने सर्वेक्षण करून धोकादायक पोल, विद्युत वाहिन्या दुरुस्त कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात आली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रंगराव देशमुख, काँग्रेसचे अविनाश उमरकर, डॉ.संदिप वाकेकर यांनी महावितरण चे वाभाडे काढले ८ दिवसांत धोकादायक पोल, विद्युत वाहिन्या दुरुस्त केल्या नाहीत तर महावितरण कार्यालयात अनोखे आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

विजेच्या धक्क्याने खेर्डा खुर्द येथील तरुणाचा मृत्यू महावितरणच्या गलथान कारभाराचा तालुक्यातील पहिला बळी..! विजेच्या धक्क्याने खेर्डा खुर्द येथील तरुणाचा मृत्यू महावितरणच्या गलथान कारभाराचा तालुक्यातील पहिला बळी..!
आधुनिक केसरी न्यूज  जळगाव जा : खेर्डा खुर्द तालुका जळगाव जामोद येथे विजेच्या ताणाचा  जोरदार शॉक लागून एका तरुणाचा दुर्दैवी...
दोन कारची समोरा-समोर धडक; एकाचा मृत्यू ९ जण जखमी,गोंदिया-तिरोडा महामार्गावरील टिकायतपूर येथील घटना
अयोध्येच्या राम मंदिरातील भाविकांच्या देणग्यांवर दरोडा टाकणारे पंतप्रधान मोदी व RSS चे ‘खास’ लोक; कारवाईचे नाटक नको, निष्पक्ष चौकशी करा : हर्षवर्धन सपकाळ
वडिगोद्रीजवळ जांभळांनी भरलेले पिकअप पलटी; रस्त्यावर विखुरलेल्या जांभळांवर नागरिकांची झडप
अखेर बहूचर्चित माजी आ.गोपालदास अग्रवाल मारहाण प्रकरणाचा निकाल 
देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी लढाई, संविधान रक्षणाच्या लढाईत अनुसुचित जातीची भूमिका महत्वाची: हर्षवर्धन सपकाळ
गोंदियाच्या 'आरोग्य देवदूत' राजश्री भोंडे यांच्या धाडसाने धावत्या ट्रेनमध्येच सुरक्षित प्रसूती; माता-बाळ सुखरूप