गोंडवाना विद्यापीठाचा विद्यार्थी रोहीत राठोडची भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड

गोंडवाना विद्यापीठाचा विद्यार्थी रोहीत राठोडची भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड

आधुनिक केसरी न्यूज 

गडचिरोली : (गो. वि.) दिनांक 5जुलै 2026 गोंडवाना विद्यापीठाचे घटक महाविद्यालय मॉडेल कॉलेजमधील बी.बी.ए. (जंगले व्यवस्थापन )शाखेचा विद्यार्थी रोहीत राठोड याची इंग्लंड येथे होणाऱ्या काउंटी क्लब क्रिकेट स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय प्रतिनिधी संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे महाविद्यालयासह गोंडवाना विद्यापीठाच्या   संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रोहीत इंग्लंडमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार असून, त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. विवेक जोशी यांच्या हस्ते त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी रोहितचे अभिनंदन करून त्याच्या आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत . 
प्राचार्यांनी यावेळी रोहितच्या यशाचे कौतुक करत , रोहितने आपल्या मेहनती, जिद्द आणि क्रीडाप्रेमाच्या बळावर ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली असून, त्याचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे अशा शब्दात त्याचे कौतुक केले .  आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही अभिमानाची बाब असून, त्याने उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालय व देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे , प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण   यांनीही त्याला शुभेच्छा दिल्या.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

ढोल-ताशांचा निनाद लेझीमचा थरार अन् भोकरदनच्या रस्त्यावर दुमदुमला ‘तिरंगा’ ढोल-ताशांचा निनाद लेझीमचा थरार अन् भोकरदनच्या रस्त्यावर दुमदुमला ‘तिरंगा’
आधुनिक केसरी न्यूज  भोकरदन : ढोल-ताशांचा कडकडाट, लेझीमचा ताल, हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी गुरुवारी...
डासांचा ‘डंख’ वाढला; प्रभाग ९ मध्ये प्रशासनाला जागे करण्याची मागणी
तिरंग्याच्या साक्षीने’ भोकरदन दुमदुमले; हर घर तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
नायकुडपुऱ्यातील कच्याड युवा शक्ती नागराज मंडळाला सापडला सुंदर शुभ्र वर्णाचा नागराज..!
नांदेड येथे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला 
देगलूर तालुक्यातील गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य; संचालक जनार्धन बिरादार यांचे आवाहन
भोकरदनच्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी’ची गस्त, पोलीस चौकी अन् CCTVची मागणी;अनिता जाधव आक्रमक