सिद्धेश्वर पॉईंटवर वाळूमाफियांचा तहसीलदारांच्या पथकावर हल्ला

सिद्धेश्वर पॉईंटवर वाळूमाफियांचा तहसीलदारांच्या पथकावर हल्ला

आधुनिक केसरी न्यूज 

वडीगोद्री (जि. जालना) : गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळूमाफियांनी थेट हल्ला केल्याची धक्कादायक घटना अंबड तालुक्यातील गोंदी येथील सिद्धेश्वर पॉईंट परिसरात बुधवारी (२६ ऑगस्ट) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या घटनेत तहसीलदार सोमेश मोहिते यांच्यासह महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. गोंदी परिसरातील सिद्धेश्वर पॉईंटजवळ गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची गुप्त माहिती तहसीलदार सोमेश मोहिते यांना मिळाली होती. त्यानुसार तहसीलदार मोहिते यांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या पथकासह पहाटेच घटनास्थळी धडक देत कारवाई सुरू केली.

पथकाने नदीपात्र आणि लगतच्या परिसरातून अवैध वाळूने भरलेली ७ ते ८ छोटी-मोठी हायवा वाहने ताब्यात घेतली. मात्र कारवाई सुरू असतानाच काही वाळू वाहतूकदार व माफिया घटनास्थळी एकत्र आले. त्यांनी महसूल पथकाशी हुज्जत घालत कारवाईला विरोध केला. वाद वाढल्यानंतर संबंधितांनी अधिकाऱ्यांवर हात उचलत धक्काबुक्की व मारहाण केल्याची माहिती आहे. या गोंधळाचा फायदा घेत काही वाळू वाहतूकदारांनी ताब्यात घेण्यात आलेली वाहने घटनास्थळावरून पळवून नेल्याचेही सांगण्यात येत आहे. शासकीय कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांवरच अशा प्रकारे हल्ला झाल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गोंदी आणि अंबड पोलिस ठाण्याचे अधिकारी व पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाची नोंद घेण्यात आली असून, शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण करणे तसेच अवैध वाळू उपसा-वाहतुकीप्रकरणी दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी सांगितले. महसूल पथकावर झालेल्या या हल्ल्यामुळे जिल्ह्यातील अवैध वाळू उपशाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, वाळूमाफियांवर प्रशासन आता कोणती कठोर कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सिद्धेश्वर पॉईंटवर वाळूमाफियांचा तहसीलदारांच्या पथकावर हल्ला सिद्धेश्वर पॉईंटवर वाळूमाफियांचा तहसीलदारांच्या पथकावर हल्ला
आधुनिक केसरी न्यूज  वडीगोद्री (जि. जालना) : गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळूमाफियांनी...
सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना; काकाचा चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार
तांत्रिकाच्या वेशात सरकारला जागविले; प्रहारचा शेतकऱ्यांसह ट्रॅक्टर मोर्चा
सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
म्हसवडमध्ये तरसांचा वावर; शेतकरी भयभीत, वनविभाग मात्र ‘कुंभकर्णी’ झोपेत!
लाच स्वीकारताना जिल्हा हिवताप कार्यालयातील दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात; ७ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
टोलनाक्यावर वाद सोडवणाऱ्या पोलिसावर हल्ला; आठ जण अटकेत