तांत्रिकाच्या वेशात सरकारला जागविले; प्रहारचा शेतकऱ्यांसह ट्रॅक्टर मोर्चा

तांत्रिकाच्या वेशात सरकारला जागविले; प्रहारचा शेतकऱ्यांसह ट्रॅक्टर मोर्चा

आधुनिक केसरी न्यूज 

गोंदिया : धानाला बोनस, कृषी पंपांना २४ तास वीजपुरवठा आणि लाडक्या बहिणींना अनुदानाचा लाभ यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (२५ ऑगस्ट) नवेझरी ते गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी व ट्रॅक्टर सहभागी झाले होते. तब्बल एक किलोमीटरपर्यंत ट्रॅक्टरची रांग लागल्याने शहरातील वातावरण घोषणांनी दणाणून गेले.

प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख महेंद्र भांडारकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. आंदोलनाचे प्रमुख आकर्षण ठरले ते भांडारकर यांनी धारण केलेले तांत्रिकाचे वेश. सरकारकडून शेतकऱ्यांना वारंवार आश्वासने देऊन प्रत्यक्षात त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत सरकारला जागे करण्यासाठी तांत्रिकाची भूमिका साकारल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणुकीच्या काळात धानाला बोनस देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अद्याप या घोषणेची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. त्याचबरोबर अनेक लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून अनुदानापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. कृषी पंपांना २४ तास वीजपुरवठा करावा, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

नवेझरी येथून निघालेला ट्रॅक्टर मोर्चा गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मार्गभर ट्रॅक्टरचा गडगडाट आणि शेतकऱ्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. मोर्चानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भैयासाहेब बेहरे यांना देण्यात आले.

जिल्हाधिकारी न आल्याने आंदोलकांचा ठिय्या

दरम्यान, निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी न आल्याने काही आंदोलक संतप्त झाले. त्यांनी रस्त्यावर ठिय्या दिल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत होण्याची परिस्थिती निर्माण झाली. अखेर निवासी उपजिल्हाधिकारी भैयासाहेब बेहरे आंदोलनस्थळी पोहोचले आणि त्यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने दिला.
...

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना; काकाचा चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना; काकाचा चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : लोहा तालुक्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात तीन वर्षांच्या चिमुकलीवर चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार...
तांत्रिकाच्या वेशात सरकारला जागविले; प्रहारचा शेतकऱ्यांसह ट्रॅक्टर मोर्चा
सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
म्हसवडमध्ये तरसांचा वावर; शेतकरी भयभीत, वनविभाग मात्र ‘कुंभकर्णी’ झोपेत!
लाच स्वीकारताना जिल्हा हिवताप कार्यालयातील दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात; ७ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
टोलनाक्यावर वाद सोडवणाऱ्या पोलिसावर हल्ला; आठ जण अटकेत
कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रातून युवक सक्षम व आत्मनिर्भर बनणार : आमदार देवतळे