सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना; काकाचा चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार
आधुनिक केसरी न्यूज
नांदेड : लोहा तालुक्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात तीन वर्षांच्या चिमुकलीवर चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली असून नराधम युवकास पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पीडित बालिकेच्या आईच्या फिर्यादीवरून सोनखेड पोलिसांनी मंगळवारी २५ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी २४ ऑगस्ट सायंकाळी पीडित चिमुकली घरासमोरील अंगणात खेळत होती. त्याच वेळी शेजारी राहणाऱ्या नातेवाईक काका विलास वाघमारे याने तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून सोबत नेले. साधारण २० ते २५ मिनिटांनंतर तो मुलीला पुन्हा घरी सोडून निघून गेला. मुलगी रडत असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले आईने विचारपूस केली असता, संबंधित व्यक्तीने तिच्यासोबत गैरकृत्य केल्याचे तिने सांगितले. चिमुकली नात्याने त्या आरोपीला 'बाबा' अशी हाक मारायची.मुलीला दुखापत झाल्याचे निदर्शनास येताच पालकांनी तिला तातडीने नांदेड विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. सदर घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत शिंदे, सोनखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पहाटे तीनच्या सुमारास संशयिताविरुद्ध पोक्सो व अन्य संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. सोनखेड पोलिसांनी सदर आरोपींचा पाठलाग करत परभणी जिल्ह्यातील पालम येथील जंगलात दबा धरून बसलेल्या विलास वाघमारे यांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. निलभ रोहन यांनी दिली .या अमानुष कृत्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List