जालना–बीड महामार्गावर दोन एसटी बसची समोरासमोर धडक; विद्यार्थी व प्रवासी जखमी

जालना–बीड महामार्गावर दोन एसटी बसची समोरासमोर धडक; विद्यार्थी व प्रवासी जखमी

आधुनिक केसरी न्यूज   

त्रिसिंग जायभाये 

जालना : बीड महामार्गावरील अंबडजवळील शहापूर येथील गलाट नदीच्या पुलावर शनिवारी (दि. ४) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी दोन्ही बसमधील अनेक विद्यार्थी व प्रवासी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबड आगाराची प्रवासी बस भांबेरे येथून विद्यार्थ्यांसह अंबडकडे येत होती. त्याचवेळी अंबडहून बीडकडे जाणारी दुसरी एसटी बस गलाट नदीच्या पुलावर समोरून आली. पुलावरच दोन्ही बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेचा आवाज परिसरात घुमताच जवळील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी तत्परता दाखवत जखमी प्रवासी व विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढून रुग्णवाहिका आणि अन्य वाहनांच्या मदतीने अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

जालना येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या जखमींमध्ये बस चालक सारंगकर, काकासाहेब ठोके, शिवकन्या चंद्रकांत गाडगे (रा. धाकलगाव), निलेश चंद्रकांत देशमुख आणि शेख चांद शेख हाफीस यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. अन्य काही प्रवाशांवर अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. अपघातामुळे काही काळ जालना–बीड महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत अपघाताचे कारण शोधण्यास सुरुवात केली आहे.या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली असली, तरी अनेक विद्यार्थी व प्रवासी जखमी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

ढोल-ताशांचा निनाद लेझीमचा थरार अन् भोकरदनच्या रस्त्यावर दुमदुमला ‘तिरंगा’ ढोल-ताशांचा निनाद लेझीमचा थरार अन् भोकरदनच्या रस्त्यावर दुमदुमला ‘तिरंगा’
आधुनिक केसरी न्यूज  भोकरदन : ढोल-ताशांचा कडकडाट, लेझीमचा ताल, हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी गुरुवारी...
डासांचा ‘डंख’ वाढला; प्रभाग ९ मध्ये प्रशासनाला जागे करण्याची मागणी
तिरंग्याच्या साक्षीने’ भोकरदन दुमदुमले; हर घर तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
नायकुडपुऱ्यातील कच्याड युवा शक्ती नागराज मंडळाला सापडला सुंदर शुभ्र वर्णाचा नागराज..!
नांदेड येथे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला 
देगलूर तालुक्यातील गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य; संचालक जनार्धन बिरादार यांचे आवाहन
भोकरदनच्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी’ची गस्त, पोलीस चौकी अन् CCTVची मागणी;अनिता जाधव आक्रमक