हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर नांदेड मनपा आयुक्त ॲक्शन मोडवर 

संवेदनशील भागांची प्रत्यक्ष पाहणी करत आपत्ती व्यवस्थापनाचा घेतला आढावा

हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर नांदेड मनपा आयुक्त ॲक्शन मोडवर 

आधुनिक केसरी न्यूज 

नांदेड : भारतीय हवामान विभागाने नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात पुढील काही दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षा आणि संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी नुकताच शहरातील विविध सखल, नदीकाठच्या आणि संवेदनशील भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करून आपत्ती व्यवस्थापन सज्जतेचा सविस्तर आढावा घेतला.
मनपा आयुक्तांनी शहरातील पूरप्रवण क्षेत्र, मुख्य नाले आणि गोदावरी नदीकाठच्या सखल भागांची पाहणी केली. त्यात प्रामुख्याने उर्दू घरा नजिकचा नाला, असदवन ते लातूर फाटा नाला, रवि नगर ते कौठा पोलीस चौकी व शगून सिटी या भागांचा समावेश होता. यावेळी शगुन सिटी मधील नागरिकांसोबत पालिका आयुक्तांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्याचवेळी पालिका आयुक्तांनी नाल्यांची सफाई, पाणी वाहून जाण्याचे मार्ग आणि ज्या भागात पाणी साचण्याची शक्यता असते, अशा ठिकाणांना भेटी देऊन त्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. नाल्यांमध्ये कचरा अडकून पाणी तुंबू नये, यासाठी अतिरिक्त सफाई कर्मचारी आणि यंत्रसामग्री तैनात करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्याचप्रमाणे आयुक्तांनी मनपाचा मुख्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष तीन शिफ्टमध्ये २४ तास सुरू राहिल याची दक्षता घेण्यासह सर्व झोनल अधिकाऱ्यांनी व अभियंत्यांनी मुख्यालय न सोडण्याचे आदेश दिले आहेत. या पाहणी दौऱ्यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, शहर अभियंता सुमंत पाटील, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग, कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर, क्षेत्रिय अधिकारी रावण सोनसळे, कनिष्ठ अभियंता ठानेदार आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

विद्यार्थ्यांचा पंतप्रधान मोदी यांच्याशी होणार थेट  संवाद; सरदार पटेल महाविद्यालयात २७ ऑगस्ट रोजी कार्यक्रम विद्यार्थ्यांचा पंतप्रधान मोदी यांच्याशी होणार थेट  संवाद; सरदार पटेल महाविद्यालयात २७ ऑगस्ट रोजी कार्यक्रम
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६ निमित्त विद्यार्थ्यांचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आभासी पद्धतीने थेट  संवाद...
सिद्धेश्वर पॉईंटवर वाळूमाफियांचा तहसीलदारांच्या पथकावर हल्ला
सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना; काकाचा चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार
तांत्रिकाच्या वेशात सरकारला जागविले; प्रहारचा शेतकऱ्यांसह ट्रॅक्टर मोर्चा
सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
म्हसवडमध्ये तरसांचा वावर; शेतकरी भयभीत, वनविभाग मात्र ‘कुंभकर्णी’ झोपेत!
लाच स्वीकारताना जिल्हा हिवताप कार्यालयातील दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात; ७ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक