शाळेतील व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्याचा नदीत बुडून मृत्यू  पिंपळगाव काळे येथील दुर्दैवी घटना

शाळेतील व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्याचा नदीत बुडून मृत्यू  पिंपळगाव काळे येथील दुर्दैवी घटना

आधुनिक केसरी न्यूज 

सागर झनके 

जळगाव जामोद : तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील सरस्वती आश्रम शाळेतील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी मोहित अनिल वाकुडकर (वय ११) रा. धानोरा महासिद्ध याचा शाळेशेजारी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता.३) सायंकाळी घडली. सदर विद्यार्थी हा सायंकाळी  शौचासाठी नदीकाठी गेला असता पाय घसरून  नदीपात्रात असलेल्या पाण्याच्या डबक्यामध्ये पडला.पाणी खोल असल्याने विद्यार्थ्यांला वाचविण्यासाठी शाळेतील शिक्षक व ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांला वाचविण्याचा प्रयत्न केला‌.मुलाला पाण्यातून बाहेर काढून  पुढील उपचारासाठी नांदुरा येथील डॉ.बढे यांच्या दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत असल्याचे घोषित केले.
 ‌

शाळेतील व्यवस्थापनाच्या बेजबाबदार पणामुळे मोहितला आपले प्राण गमवावे लागले.शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी  सुख सुविधांची वानवा असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.शाळेचे शिक्षक मुख्यालयी राहत नाही.मुख्याध्यापक रेवस्कर सर हे सुद्धा मुख्यालयी राहत नाही.निवासी शाळेमध्ये शिक्षकांनी मुख्यालयी राहावे असे प्रशासनाचे आदेश असतानाही शाळेचे  शिक्षक मुख्यालयी राहत नाही.कदाचीत सरस्वती आश्रम शाळेतील शिक्षक मुख्यालयी राहत असते तर त्याचे शंभर टक्के लक्ष विद्यार्थ्यांवर राहिले असते.मोहितचा असा दुर्दैवी मृत्यू झाला नसता.शाळेतील व्यवस्थापनाच्या नाकर्तेपणामुळेच मोहितला आपला जीव गमवावा लागला. घटणेच्या दुसऱ्या दिवशी ४जुलै रोजी दुपारी धानोरा महासिद्ध येथे मुळ गावी शोकाकुल वातावरणात मोहितवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जळगाव जामोदचे पी.एस.आय.खाडे ,बिट जमदार आणि नांदुरा पोलिस स्टेशनचे पोलीस ठाणेदार सातव, ट्राफिक पोलीस वाघमारे व त्यांचे सहकारी हजर होते. "मोहित च्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या  शाळेतील शिक्षकांना कायमस्वरूपी निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. शाळेचा परवाना रद्द करण्यात यावा. ज्या ठिकाणी अशा आदिवासी आश्रम शाळा आहेत त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  लक्ष द्यावे जेणेकरून अशा प्रकारचे दुर्दैवी घटना परत घडणार नाही. अशी मागणी ग्रामस्थ व नातेवाईंकडून केला जात आहे"

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

ढोल-ताशांचा निनाद लेझीमचा थरार अन् भोकरदनच्या रस्त्यावर दुमदुमला ‘तिरंगा’ ढोल-ताशांचा निनाद लेझीमचा थरार अन् भोकरदनच्या रस्त्यावर दुमदुमला ‘तिरंगा’
आधुनिक केसरी न्यूज  भोकरदन : ढोल-ताशांचा कडकडाट, लेझीमचा ताल, हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी गुरुवारी...
डासांचा ‘डंख’ वाढला; प्रभाग ९ मध्ये प्रशासनाला जागे करण्याची मागणी
तिरंग्याच्या साक्षीने’ भोकरदन दुमदुमले; हर घर तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
नायकुडपुऱ्यातील कच्याड युवा शक्ती नागराज मंडळाला सापडला सुंदर शुभ्र वर्णाचा नागराज..!
नांदेड येथे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला 
देगलूर तालुक्यातील गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य; संचालक जनार्धन बिरादार यांचे आवाहन
भोकरदनच्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी’ची गस्त, पोलीस चौकी अन् CCTVची मागणी;अनिता जाधव आक्रमक