नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी पाटील..!
On
आधुनिक केसरी न्यूज
नांदेड : जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून महेश पाटील यांची बदली झाली असून ते पुणे येथे सारथीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी मेघना कावली ह्या प्रसुती रजेवर गेल्यामुळे रिक्त जागेवर त्यांची बदली झाली आहे.
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मेघना कावली ह्या गेल्या आठवड्यात त्या प्रसुती रजेवर गेल्या आहेत. मुख्यकार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संदिप माळोदे यांच्याकडे देऊन त्या रजेवर गेल्या आहेत. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी ३० जून रोजी नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून पुणे येथील सारथीचे व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील यांची बदली केली आहे.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
30 Jun 2026 20:30:49
आधुनिक केसरी न्यूज नांदेड : जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून महेश पाटील यांची बदली झाली असून ते पुणे येथे सारथीचे...

Comment List