रिक्षा-बसचा अपघात, रिक्षाचालक गंभीर धाकलगावजवळील घटना; बसमधील २२ प्रवासी बचावले

रिक्षा-बसचा अपघात, रिक्षाचालक गंभीर धाकलगावजवळील घटना; बसमधील २२ प्रवासी बचावले

 आधुनिक केसरी न्यूज 

 त्रिसिंग जायभाये 

वडीगोद्री : वडीगोद्री-जालना मार्गावरील धाकलगाव जवळ रिक्षा आणि बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास घडली. रिक्षा राँग साईडने आल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. बस चालकाच्या सतर्कतेमुळे २२ प्रवासी बचावले.

शहागडहून अंबडकडे जाणारी रिक्षा (एमएच २० एचयू १०३६) राँग साईडने जात असताना, समोरून येणाऱ्या बसला (एमएच २० बीएल २१५०) धडकली. संभाव्य मोठा धोका ओळखून बसचालकाने समयसूचकता दाखवत बस रस्त्याच्या कडेला वळवली. यामुळे बस रस्त्यालगतच्या भागात अडकली. सुदैवाने ती खड्ड्यात कोसळली नाही. बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असून, त्यांना आपत्कालीन दरवाजातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

या अपघातात रिक्षाचालक आसिफ नसीर पठाण (वय ३२, रा. सोंडलगाव, ता. घनसावंगी) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे वडीगोद्री-जालना मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

चार दिवसांत तिसरा अपघात; नागरिक संतप्त

वडीगोद्री परिसरात गेल्या चार दिवसांत अपघातांची मालिका सुरू आहे. ही या कालावधीतील तिसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.या मार्गावर वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून, प्रशासनाने तातडीने कडक पावले उचलत सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

रिक्षा-बसचा अपघात, रिक्षाचालक गंभीर धाकलगावजवळील घटना; बसमधील २२ प्रवासी बचावले रिक्षा-बसचा अपघात, रिक्षाचालक गंभीर धाकलगावजवळील घटना; बसमधील २२ प्रवासी बचावले
  आधुनिक केसरी न्यूज   त्रिसिंग जायभाये  वडीगोद्री : वडीगोद्री-जालना मार्गावरील धाकलगाव जवळ रिक्षा आणि बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालक गंभीर
पडोली अत्याचार प्रकरणात पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी..!
खोटारड्या भाजपा सरकारकडून बळीराजाचा विश्वासघात, शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ
वडीगोद्री परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; गाय व शेळीवर हल्ला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
समृद्धी महामार्गावरील अपघातात  चंद्रपूरातील एकाच कुटुंबातील पाच जण ठार 
गद्दार खासदारांची गाढवावरून धिंड..! 
नागभीडमध्ये हगवण-उलटीच्या रुग्णांमध्ये वाढ; पाणीपुरवठ्याची तातडीने तपासणी करण्याची मागणी..!