पडोली अत्याचार प्रकरणात पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी..!
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : दि. 30/6/2026 पडोली येथे पाच वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण समाज अस्वस्थ झाला आहे. या अत्यंत संवेदनशील प्रकरणात पीडितेला तातडीने न्याय मिळावा, आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी आणि न्यायालयीन प्रक्रिया प्रभावीपणे पार पडावी, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
या खटल्यात शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, तसेच प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालविण्यात यावा, अशी प्रमुख मागणी केली. याशिवाय पीडित चिमुरडी आणि तिच्या कुटुंबाला आवश्यक वैद्यकीय, मानसिक व कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यासह भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी बालकांच्या सुरक्षेबाबत अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणीही करण्यात आली. या प्रकरणात कोणत्याही दोषीला पाठीशी घातले जाणार नाही. पीडितेला न्याय मिळेपर्यंत माझा पाठपुरावा कायम राहील असे जोरगेवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List