गद्दार खासदारांची गाढवावरून धिंड..!
On
आधुनिक केसरी न्यूज
नांदेड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी गद्दारी करून शिंदे गटात सामील झालेल्या गद्दार खासदारांची युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन पाटील यांनी गाढवावरून प्रतिकात्मक धिंड काढली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या सहा खासदारांनी पक्षाशी गद्दारी करून एकनाथ शिंदे यांच्याशी हात मिळवणी केली. ज्या शिवसेनेने त्यांना मोठे केले त्या पक्षाशी गद्दारी गदर करणाऱ्या या खासदारांची शहरातील प्रमुख मार्गावरून युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन पाटील यांनी गाढवावरून प्रतिकात्मक धिंड काढली. यावेळी तालुका प्रमुख अशोक पावडे, गणेश पेनसलवार, सौरभ देवकते आदी उपस्थित होते.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
27 Jun 2026 19:08:43
आधुनिक केसरी न्यूज नांदेड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी गद्दारी करून शिंदे गटात सामील झालेल्या गद्दार खासदारांची युवा सेनेचे...

Comment List