नागभीडमध्ये हगवण-उलटीच्या रुग्णांमध्ये वाढ; पाणीपुरवठ्याची तातडीने तपासणी करण्याची मागणी..!

भाजपा गटनेते गणेश तर्वेकर व इतर सर्व भाजपा नगरसेवक यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

नागभीडमध्ये हगवण-उलटीच्या रुग्णांमध्ये वाढ; पाणीपुरवठ्याची तातडीने तपासणी करण्याची मागणी..!

आधुनिक केसरी न्यूज 

नागभीड : नगर परिषद नागभीड हद्दीतील काही प्रभागांमध्ये हगवण-उलटीच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या परिस्थितीत पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित होत असून, दूषित पाणीपुरवठ्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजपा गटनेते गणेश तर्वेकर  व सर्व भाजपा नगरसेवक यांनी नगर परिषद नागभीडच्या मुख्याधिकारी सोनम देशमुख यांना निवेदनाद्वारे केली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नगर परिषद क्षेत्रातील काही भागांमध्ये हगवण-उलटीच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आजारांचा संबंध पिण्याच्या पाण्याशी असण्याची शक्यता लक्षात घेता, नगरपरिषदेकडून पुरविण्यात येणाऱ्या पाण्याची तात्काळ प्रयोगशाळेत तपासणी करण्यात यावी. तसेच जलशुद्धीकरण केंद्र, पाणी साठवण टाक्या आणि संपूर्ण पाईपलाईनची सखोल पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण व दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय ज्या प्रभागांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे, त्या भागात आरोग्य विभागाच्या समन्वयाने विशेष आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहीम आणि जनजागृती कार्यक्रम राबवावेत. नागरिकांना उकळून व स्वच्छ पाणी पिण्याबाबत सूचना देण्यात याव्यात तसेच परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

गणेश तर्वेकर यांनी सांगितले की, नागरिकांचे आरोग्य सर्वांत महत्त्वाचे असून, कोणत्याही प्रकारची कॉलरासदृश्य किंवा साथीच्या रोगाची परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी प्रशासनाने दक्षता घेणे आवश्यक आहे. सुरक्षित आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची मूलभूत जबाबदारी आहे. त्यामुळे प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहून तातडीने आवश्यक कार्यवाही करावी.अशी आग्रही मागणी नगरपरिषद मुख्याधिकारी सोनम देशमुख यांना निवेदन देतांना केली. यावेळी गटनेते गणेश तर्वेकर, नगरसेवक अवेश पठाण, सचिन आकुलवार, प्रा. अमीर धम्मानी, हेमंत नन्नावरे, सौ.प्रिया लांबट, सौ. शिल्पा शेंडे उपस्तित होते. या निवेदनाची नगरपरिषद प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन पाणीपुरवठ्याची तपासणी व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांमधूनही व्यक्त होत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

नागभीडमध्ये हगवण-उलटीच्या रुग्णांमध्ये वाढ; पाणीपुरवठ्याची तातडीने तपासणी करण्याची मागणी..! नागभीडमध्ये हगवण-उलटीच्या रुग्णांमध्ये वाढ; पाणीपुरवठ्याची तातडीने तपासणी करण्याची मागणी..!
आधुनिक केसरी न्यूज  नागभीड : नगर परिषद नागभीड हद्दीतील काही प्रभागांमध्ये हगवण-उलटीच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता...
विजेच्या धक्क्याने खेर्डा खुर्द येथील तरुणाचा मृत्यू महावितरणच्या गलथान कारभाराचा तालुक्यातील पहिला बळी..!
दोन कारची समोरा-समोर धडक; एकाचा मृत्यू ९ जण जखमी,गोंदिया-तिरोडा महामार्गावरील टिकायतपूर येथील घटना
अयोध्येच्या राम मंदिरातील भाविकांच्या देणग्यांवर दरोडा टाकणारे पंतप्रधान मोदी व RSS चे ‘खास’ लोक; कारवाईचे नाटक नको, निष्पक्ष चौकशी करा : हर्षवर्धन सपकाळ
वडिगोद्रीजवळ जांभळांनी भरलेले पिकअप पलटी; रस्त्यावर विखुरलेल्या जांभळांवर नागरिकांची झडप
अखेर बहूचर्चित माजी आ.गोपालदास अग्रवाल मारहाण प्रकरणाचा निकाल 
देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी लढाई, संविधान रक्षणाच्या लढाईत अनुसुचित जातीची भूमिका महत्वाची: हर्षवर्धन सपकाळ