समृद्धी महामार्गावरील अपघातात चंद्रपूरातील एकाच कुटुंबातील पाच जण ठार
धामणगाव रेल्वे मार्गावर झाला अपघात
On
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : दि. 28/6/2026 नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे परिसरात एक चार चाकी वाहन कंटेनरला धडकल्यामुळे चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरामध्ये शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे मागे राहणाऱ्या जीवने कुटुंबातील पाच जण ठार झाल्याची हृदयावक घटना समोर आली आहे. 28 जून रोजी सकाळी 11. 40 च्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये भास्कर महादेव जीवने, महादेव शिवाजी जीवने, सौ. भारती भास्कर जीवने, लता महादेव जीवने आणि कुमारी त्रिशा भास्कर जीवने ( वय दहा वर्ष ) अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने चंद्रपूर शहरात शोककळा पसरली आहे.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
28 Jun 2026 16:08:08
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : दि. 28/6/2026 नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे परिसरात एक चार...

Comment List