जनतेचा विश्वास सार्थक करण्यासाठी कार्यालय : ना.डॉ.अशोक उईके

आ.करण देवतळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन

जनतेचा विश्वास सार्थक करण्यासाठी कार्यालय : ना.डॉ.अशोक उईके

आधुनिक केसरी न्यूज

​वरोडा :  विधानसभा मतदारसंघातील गरिबांतल्या गरीब माणसाला, शेतकरी आणि शेतमजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी हे नूतन भाजप कार्यालय केवळ राजकीय केंद्र न राहता जनतेच्या सेवेचे पवित्र मंदिर ठरेल असा विश्वास राज्याचे आदिवासी विकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उईके यांनी व्यक्त केला.
 वरोडा येथील सहकार महर्षी दादासाहेब देवतळे जिनिंग प्रेसिंग सोसायटी परिसरात आमदार करण संजय देवतळे यांच्या जनसंपर्क तथा भारतीय जनता पक्षाच्या नवीन कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यात ते उदघाटक म्हणून बोलत होते.

याप्रसंगी मंचावर केंद्रीय माजी राज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार करण देवतळे, जिल्हा भाजपा अध्यक्ष हरीश शर्मा, अशोक जीवतोडे, विजय देवतळे, आमदार महोदय यांच्या मातोश्री स्वेता देवतळे, भद्रावतीचे भाजपा नेते चंदू गुंडावार, जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष तनय देशकर,रघुवीर अहीर, बाबा भागडे, शहर भाजपा अध्यक्ष संतोष पवार, वंदना दाते, श्यामसुंदर उरकुडे, दयानंद जांभुळे,राजेंद्र सवई, डॉ. भगवान गायकवाड यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी  उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी राज्याचे आदिवासी मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक अशोक उईके यांच्या हस्ते भाजपचे भव्य कार्यालयाचे फीत कापून उद्घाटन झाले. याप्रसंगी राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
 पुढे बोलतांना डॉ. उईके यांनी कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर विशेष भर दिला. ते म्हणाले, "पक्षाचा कार्यकर्ता हा आपला केंद्रबिंदू आहे. आज आपण जे काही आहोत, ते कार्यकर्त्यांच्या अहोरात्र कष्टांमुळेच आहोत. या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि सर्वसामान्य नागरिकाचा योग्य सन्मान राखला गेला पाहिजे. एखाद्या वेळेस काम झाले नाही तरी चालेल, पण कोणाचाही अनादर होणार नाही याची काळजी नियोजनबद्ध रीतीने घेतली जावी. 

विकास निधी देणार वरोडा मतदारसंघाच्या विकासाचा उल्लेख करत पालकमंत्र्यांनी स्थानिक आमदार करण देवतळे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. ते म्हणाले की, करण देवतळे हे अतिशय प्रामाणिकपणे आणि आक्रमकतेने जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडत आहेत. तुमच्या परिवाराने या मतदारसंघासाठी मोठे योगदान दिले आहे. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शब्द देतो की, वरोडा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वपक्षीय आणि सर्वांगीण विकासासाठी निधी कधीही कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.   तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे सांगत त्यांनी या कार्यालयाच्या माध्यमातून सेवा, संपर्क, समर्पण आणि संघटन या चार सूत्रांवर काम करण्याचे आवाहन केले.

आमदार देवतळे एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व:अहीर

वरोडा भद्रावती विधानसभा क्षेत्रात देवतळे कुटुंबाबद्दल प्रेम असून त्यांचे निष्कलंक राजकारण ही त्यांची जमेची बाजू आहे. आमदार देवतळे एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व असून चांगले संस्कार घेऊन ते जनसेवेसाठी सज्ज आहेत. या  जनसंपर्क कार्यालयाचा उपयोग जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी होईल. या कार्यालयातून सर्वांना सोबत घेऊन आपण अनुकरणीय काम कराल असा आशीर्वाद याप्रसंगी बोलताना माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी यावेळी बोलताना आमदार करण देवतळे यांना दिला.
 त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारा वर्षाच्या कार्यकालाचा आढावाही उपस्थितांसमोर मांडला आहे. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तनय देशकर व ओबीसी महासंघाचे अशोक जीवतोडे यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व भारत माता, स्वर्गीय दिनदयाल उपाध्याय व स्वर्गीय शामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. या नेत्यदीपक सोहळ्याचे संचलन राजीव दोडके यांनी  तर गजानन राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले. या उदघाटन सोहळ्याला वरोरा भद्रावती तालुक्यातील नागरिक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

एक पेड पिता के नाम ' उपक्रमातून पितृस्मृतीला हरित अभिवादन एक पेड पिता के नाम ' उपक्रमातून पितृस्मृतीला हरित अभिवादन
आधुनिक केसरी न्यूज वरोडा : वडील हे प्रत्येकाच्या जीवनातील आधारस्तंभ असतात. ' एक पेड माँ के नाम ' या देशव्यापी...
जनतेचा विश्वास सार्थक करण्यासाठी कार्यालय : ना.डॉ.अशोक उईके
शाळेतील व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्याचा नदीत बुडून मृत्यू  पिंपळगाव काळे येथील दुर्दैवी घटना
जालना–बीड महामार्गावर दोन एसटी बसची समोरासमोर धडक; विद्यार्थी व प्रवासी जखमी
अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा नालेवाडीचे सरपंच अरुण घुगे यांची गळफास घेऊन आत्महत्या
बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी आम्ही सज्ज; अनधिकृत शाळांवरही होणार कारवाई: किरीट सोमय्या
वडूजमध्ये ३० लाखांचा बनावट खतसाठा जप्त; पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा