चौदा वर्षीय बालकास वानराचा कडाडून चावा ;नांदेड येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल
आधुनिक केसरी न्यूज
लोहा : निसर्गाच्या लहरीपणामुळे पाणी पातळीत झालेली घट, पर्यावरणाच्या असंतूलनामुळे वन्य प्राणी अन्न व पाण्याच्या शोधात आता मानवी वस्तीत झालेला शिरकाव वानर अजूनही मानवी वस्तीतच ठाण मांडून असल्याचे दिसून येत आहे. शहरातील बिडवई नगर भागातील घराच्या अंगणात, गच्चीवर,मंदीरावर वानराचा वावर वाढला असून दि. ३० जून रोजी मंगळवारी चौदा वर्षांच्या शाळकरी मुलावर वानराने अचानक हल्ला चढवला.शाळकरी मुलास वानराने कडाडून चावा घेतल्याने तो बालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
शहरातील बिडवई नगर परिसरात शिवानंद मोटरवार यांचे घर असून दि. २० रोजी मंगळवारी घरासमोर खेळत होता.घरातील मंडळी कामात व्यस्त होते तर श्रीराम शिवानंद मोटरवार (वय १४ वर्ष ) यास वानराच्या टोळीतील एका वानराने सदर चिमुकल्यावर अचानक हल्ला चढवत कडाडून चावा घेवून गंभीर जखमी केले. त्याच्यावर नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.तसेच शहरात अनेक ठिकाणी कांहीं महिलांना, मुलांना वानराने चावा घेतल्याच्या घटना वारंवार घडल्या.दोन दिवसांतच मराठ गल्ली येथील हमाल असलेला व्यक्तीवर ही वानराने अचानक हल्ला केला.वानराच्या हैदोसामुळे लोहा वाशियात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मानवी वसाहतीत मोकाट फिरणारे वानर आणि माकडांचा वन विभागाने तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List