ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

आधुनिक केसरी न्यूज 

निलेश मोरे

दौंड : दि. २ तालुक्यातील खडकी येथील तुकाईनगर परिसरात ट्रॅक्टरला जोडलेल्या औषध फवारणी यंत्रात साडी अडकून एका ४० वर्षीय महिलेचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. १) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. मृत महिलेचे नाव मीनाबाई हरी काळे (वय ४०, रा. खडकी तुकाईनगर, ता. दौंड, जि. पुणे) असे आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी येथील कल्पेश सुरेश ओस्तवाल यांच्या शेतात औषध फवारणीचे काम सुरू होते. ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्राच्या टाकीमध्ये किती औषध शिल्लक आहे, हे पाहण्यास मीनाबाई काळे गेल्या होत्या. त्या यंत्राजवळ उभे राहून टाकीतील औषधाची पातळी पाहत असताना त्यांच्या साडीचा पदर ट्रॅक्टर व फवारणी यंत्राला जोडलेल्या फिरत्या शॉफ्टमध्ये अडकला. यंत्र सुरू असल्याने त्या क्षणार्धात फिरत्या शाफ्टमध्ये ओढल्या गेल्या. या भीषण अपघातात त्यांच्या शरीराचे गंभीर तुकडे होऊन घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी राकेश दत्तात्रय काळे (रा. खडकी गुणवरेवस्ती, ता. दौंड) यांनी खबर दिली असून भिगवण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज  निलेश मोरे दौंड : दि. २ तालुक्यातील खडकी येथील तुकाईनगर परिसरात ट्रॅक्टरला जोडलेल्या औषध फवारणी यंत्रात साडी...
इतवारा पोलिसांकडून धडक कारवाई ;6 हजार 500 प्रतिबंधित गोळ्या, ७७१ ग्रॅम गांजा जप्त
Breking News : अकोल्याचे आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँग कडून पुन्हा धमकी; वडेट्टीवार यांनी लक्षवेधी माध्यमातून उपस्थित केला प्रश्न
नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी पाटील..! 
माजी आमदार जवळगावकर भाजपाच्या कळपात; नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाचे सवंगडी 
रिक्षा-बसचा अपघात, रिक्षाचालक गंभीर धाकलगावजवळील घटना; बसमधील २२ प्रवासी बचावले
पडोली अत्याचार प्रकरणात पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी..!