इतवारा पोलिसांकडून धडक कारवाई ;6 हजार 500 प्रतिबंधित गोळ्या, ७७१ ग्रॅम गांजा जप्त
आधुनिक केसरी न्यूज
नांदेड : जिल्ह्यात अंमली पदार्थांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत इतवारा पोलिसांनी प्रभावी कारवाई करण्यात आली असून इतवारा पोलिसांनी प्रतिबंधित ६ हजार ५०० गोळ्या व ७७१ ग्राम गांजा जप्त केला आहे. याबाबत इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतवारा पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्रिगालॅब-300
प्रतिबंधित औषधाचे 65 बॉक्स प्रत्येकी 10 गोळ्यांच्या स्ट्रिप प्रमाणे एकूण 6,500 गोळ्या, 771 ग्रॅम गांजा, एक तलवार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात विनोद रामचंद्र जोंधळे याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. सदर प्रकरणात इतर आरोपी अथवा अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. तपासाच्या अनुषंगाने पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. सदरील कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक सूरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत शिंदे, पोलिस निरीक्षक खनाळ, संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक देशमुख तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण आगलावे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बैग, पोलीस अंमलदार जगताप, रिठेवाड, कोरनुळे, इस्राईल, सुखई, कदम, महिला अंमलदार कांबळे, शिंदे यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. नांदेड जिल्हा पोलीसांकडून अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर व प्रभावी कारवाई सुरू राहणार असून, नागरिकांनी अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List