पत्रकार च्या नावाखाली गुटखा तस्करी; बिलोली पोलिसांची धडक कारवाई, ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त

पत्रकार च्या नावाखाली गुटखा तस्करी; बिलोली पोलिसांची धडक कारवाई, ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त

आधुनिक केसरी न्यूज 

  दिलीप घाटे

बिलोली : पत्रकारितेच्या पवित्र ओळखीचा गैरवापर करून ‘प्रेस’चा फलक लावलेल्या दुचाकीवरून सुगंधित गुटखा आणि तंबाखूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला बिलोली पोलिसांनी रंगेहात पकडत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ५१ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, तंबाखू आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. निलभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, बिलोली पोलीस ठाण्याचे पथक खदगाव-मिनकी मार्गावर नियमित गस्त घालत असताना एमएच-२६-सीजे-६५५३ क्रमांकाची मोटारसायकल संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला सागर पान मसाला, सुगंधित गुटखा आणि तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने आपल्या मोटारसायकलवर मोठ्या अक्षरांत ‘PRESS’ असा फलक लावला होता. पोलिसांची दिशाभूल करून बेकायदेशीर धंद्यांना संरक्षण मिळविण्यासाठी पत्रकारितेच्या नावाचा वापर केला जात असल्याचे या घटनेतून समोर आले आहे.

या घटनेनंतर पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांनी कठोर भूमिका घेत शहरात आणि तालुक्यात ‘प्रेस’ लिहिलेल्या वाहनांची तसेच संबंधित व्यक्तींच्या प्रेस ओळखपत्रांची विशेष तपासणी करण्याचे संकेत दिले आहेत. “पत्रकारितेच्या नावाचा गैरवापर करून अवैध धंदे करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. खोटे प्रेस कार्ड आणि बनावट ओळखीच्या माध्यमातून कायद्याला चकवा देणाऱ्यांविरोधात कठोर रकारवाई केली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला. या प्रकरणी आरोपी शिवदर्शन नंदयप्पा स्वामी (वय ४४) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता  कायद्यानुसार संबंधितां वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. देगलूरकर आणि पोलीस कॉन्स्टेबल निरंजन अंबुरे यांच्या पथकाने केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. देगलूरकर करीत आहेत. दरम्यान, ‘प्रेस’ या नावाचा वापर करून सुरू असलेल्या अवैध कारवायांमुळे खऱ्या आणि प्रामाणिक पत्रकारांची प्रतिमा मलीन होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात बनावट प्रेस ओळखपत्रे आणि ‘प्रेस’ फलक लावून फिरणाऱ्या वाहनांची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वडूजमध्ये ३० लाखांचा बनावट खतसाठा जप्त; पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा वडूजमध्ये ३० लाखांचा बनावट खतसाठा जप्त; पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा
आधुनिक केसरी न्यूज  म्हसवड : खटाव तालुक्यातील वडूज येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाने व पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सुमारे ३०...
चौदा वर्षीय बालकास  वानराचा कडाडून चावा ;नांदेड येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल
पत्रकार च्या नावाखाली गुटखा तस्करी; बिलोली पोलिसांची धडक कारवाई, ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त
ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू
इतवारा पोलिसांकडून धडक कारवाई ;6 हजार 500 प्रतिबंधित गोळ्या, ७७१ ग्रॅम गांजा जप्त
Breking News : अकोल्याचे आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँग कडून पुन्हा धमकी; वडेट्टीवार यांनी लक्षवेधी माध्यमातून उपस्थित केला प्रश्न
नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी पाटील..!