वडूजमध्ये ३० लाखांचा बनावट खतसाठा जप्त; पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा
आधुनिक केसरी न्यूज
म्हसवड : खटाव तालुक्यातील वडूज येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाने व पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सुमारे ३० लाख रुपये किमतीचा संशयित बनावट खतसाठा जप्त केला. ही कारवाई पेडगाव रस्त्यावरील एका शेडमध्ये करण्यात आली.
या प्रकरणी दिलीप सीताराम काळे व प्रतीक दिलीप काळे या दोघांविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कृषी विभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांच्या मदतीने छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर संशयित बनावट खताचा साठा आढळून आला. त्यानंतर संबंधित खतसाठा जप्त करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे बनावट खतांचा पुरवठा करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास कृषी विभाग व पोलीस प्रशासनाकडून सुरू असून, जप्त केलेल्या खताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List