अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा नालेवाडीचे सरपंच अरुण घुगे यांची गळफास घेऊन आत्महत्या

अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा नालेवाडीचे सरपंच अरुण घुगे यांची गळफास घेऊन आत्महत्या

आधुनिक केसरी न्यूज 

त्रिसिंग जायभाये 

वडीगोद्री :नालेवाडी येथील सरपंच तसेच अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अरुण घुगे यांनी शनिवारी (दि. ४) सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेल्यानंतर लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे नालेवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अरुण घुगे हे नेहमीप्रमाणे सकाळी फिरण्यासाठी गेले होते. याच दरम्यान त्यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, पाचोड येथे आणण्यात आला. आवश्यक पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असून संबंधित यंत्रणेकडून पुढील तपास सुरू आहे.

अरुण घुगे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ – गणेश घुगे व गजानन घुगे, तसेच भावजया असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून नालेवाडी गावासह राजकीय, सामाजिक व कृषी क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्यावर आज दि ४ रोजी दुपारी ३ वाजता नालेवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रातून युवक सक्षम व आत्मनिर्भर बनणार : आमदार देवतळे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रातून युवक सक्षम व आत्मनिर्भर बनणार : आमदार देवतळे
आधुनिक केसरी न्यूज  वरोडा : वरोडा भद्रावती विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे युवा व तडफदार आमदार करण देवतळे यांनी आपल्या क्षेत्रात विकासात्मक...
गावच्या चर्चेने पतीच्या मृत्यूचे खापर प्रियकरावर;सिडीआरने पत्नीचाही ‘मुखवटा’ उतरवला..!
खाकीला आधुनिक ‘बळ’आ.दानवेंच्या पाठपुराव्याला यश; भोकरदन-जाफ्राबादच्या चार ठाण्यांना १६.५३ कोटी मंजूर
‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाला तेच लोक विरोध करत आहेत ज्यांनी सावित्रीमाई फुलेंवर दगड व शेणाचे गोळे फेकले : कन्हैयाकुमार
21ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
विद्यार्थिनीचा पाठलाग करून फोटो व्हायरल करण्याची धमकी; जामोद येथे तरुणाविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा
मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी किशोर सोनवणे यांचे आमरण उपोषण सुरू