बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी आम्ही सज्ज; अनधिकृत शाळांवरही होणार कारवाई: किरीट सोमय्या

बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी आम्ही सज्ज; अनधिकृत शाळांवरही होणार कारवाई: किरीट सोमय्या

आधुनिक केसरी न्यूज 

 केदार शर्मा

परतूर : भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी आज परतूर येथील एका वादग्रस्त इंग्रजी शाळेला भेट देऊन पाहणी केली. या भेटीनंतर त्यांनी स्थानिक प्रशासन, पोलीस अधिकारी आणि राजकीय कार्यकर्त्यांसमोर विविध मुद्द्यांवरून जोरदार हल्लाबोल केला.

अनधिकृत शाळेवर प्रशासकीय कारवाईची मागणी

शाळेची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी प्रशासनाला धारेवर धरले. "सदरील शाळेला कोणतीही मान्यता नसताना आणि शाळेच्या इमारतीला परिसराची कोणतीही परवानगी नसताना ही शाळा अद्याप पर्यंत उभीच कशी आहे?" असा सवाल त्यांनी उपस्थित अधिकारी व पोलिसांना केला. "तुम्ही आरोपींना पाठीशी घालत आहात," असा स्पष्ट आरोप करत त्यांनी संबंधित पोलीस अधिकारी व मुख्याधिकारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा केली. हा संपूर्ण प्रकार आपण शासन स्तरावर मांडणार असून यातील दोषी अधिकाऱ्यांना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. तत्पूर्वी, सोमय्या यांनी येथील उपविभागीय कार्यालयात तब्बल तासभर या शाळेच्या बाबतीत चौकशी केली व तक्रार दाखल केली.

'एसआयआर' (SIR) बाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

शाळेला भेट दिल्यानंतर किरीट सोमय्या यांनी भाजप प्रदेश सचिव राहुल भैय्या लोणीकर यांच्या संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी 'एसआयआर' (मतदार यादी शुद्धीकरण) मोहिमेबाबत कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

"घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी सज्ज"

आपल्या भाषणात हिंदुत्वाचा आणि राष्ट्रीयत्वाचा मुद्दा उपस्थित करत किरीट सोमय्या म्हणाले की, मेट्रो शहरांपासून थेट गाव पातळीपर्यंत बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. यासाठी गावपातळीवरील लोकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. ज्यांचा येथे जन्म झालेला नाही, अशा संशयास्पद आणि अवैध लोकांच्या नावांची मतदार यादीतून वगळणी करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी पुढे सांगितले की, "मोदीजींच्या नेतृत्वात देशात मोठे बदल होत आहेत. राम मंदिराचे निर्माण झाले आहे, काश्मीरमधून कलम ३७० रद्द झाले आहे. आता वेळ आली आहे मतदार यादी शुद्धीकरणाची. पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये लाखो अवैध नावे कापली गेली आहेत, आता महाराष्ट्रातील मतदार यादीतूनही सुमारे ५० लाख बांगलादेशी घुसखोर मुस्लिमांची नावे हटवण्याचा आमचा संकल्प आहे."

अनधिकृत इमारत पाडणारच: राहुल लोणीकर

तत्पूर्वी, भाजपचे प्रदेश सचिव राहुल भैय्या लोणीकर यांनीही याप्रसंगी आपले मत मांडले. सदरील वादग्रस्त शाळेबाबत प्रशासकीय पातळीवर आपण पूर्ण पाठपुरावा करणार असून, ही अनधिकृत इमारत पाडणारच, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधी, अनेक प्रमुख पदाधिकारी, पक्ष कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. किरीट सोमय्या यांनी कार्यकर्त्यांना मतदार यादीतील प्रत्येक अवैध नाव शोधून काढण्यासाठी 'स्पेशल सेल'च्या माध्यमातून काम करण्याचे आवाहन करत आगामी ५० वर्षे देश आणि राज्यात केवळ भाजपचेच संघटन मजबूत राहील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी भाजपाचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना; काकाचा चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना; काकाचा चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : लोहा तालुक्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात तीन वर्षांच्या चिमुकलीवर चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार...
तांत्रिकाच्या वेशात सरकारला जागविले; प्रहारचा शेतकऱ्यांसह ट्रॅक्टर मोर्चा
सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
म्हसवडमध्ये तरसांचा वावर; शेतकरी भयभीत, वनविभाग मात्र ‘कुंभकर्णी’ झोपेत!
लाच स्वीकारताना जिल्हा हिवताप कार्यालयातील दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात; ७ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
टोलनाक्यावर वाद सोडवणाऱ्या पोलिसावर हल्ला; आठ जण अटकेत
कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रातून युवक सक्षम व आत्मनिर्भर बनणार : आमदार देवतळे