भोकरच्या कचरा डेपो वर बिबट्याचा वावर..!

नागरीकात भितीचे वातावरण नागरीकानी सावधगीरी बाळगावावी वनविभागाचे अहवान

भोकरच्या कचरा डेपो वर बिबट्याचा वावर..!

आधुनिक केसरी न्यूज 

भोकर : शहरातील हनूमाननगर परिसरात लगत नगरपरिषदेचा कचरा डेपो (डम्पिंग ग्राउंड) आहे. मंगळवारी ता. (आठ) पहाटेच्या सुमारास सफाई कामगार कचरा टाकण्यासाठी गेले असता बिबट्या दिसुन आल्याने  घाबरगुंडी उडाली. वनविभागाला माहिती  मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली . नागरीकानी सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून रेणापूर,रिठ्ठा,मोघाळी,सिताखांडी भागात बिबट्याचा वावर आहे. सावजाच्या शोधात आलेल्या बिबट्यानी अनेकदा जनावराव हल्ला केल्याच्या घटणा घडल्या आहेत. शहरातील हनुमान नगर परिसरात  नगर परिषदेचा कचरा डेपो (डपींग ग्राउंड) असून  मंगळवारी  रात्री आठ वाजताच्या दरम्यान नियमित प्रमाणे सफाई कामगार कचरा टाकण्यासाठी गेले असता तीथेच बिबट्या दिसुन आला.वन्यप्राण्याला पाहून कामगारांची घाबरगुंडी उडाली. परिसरातील नागरिकांना  माहिती मिळताच घटनास्थळी  नगरसेवक यज्ञेश देशपांडे, सिताराम मेटकर यांनी सुतळी बाम उडवून त्यास पळवून लावले. वनविभागाचे कर्मचारी एस.टि घोरबांड,ए.पी.मुंडकर,एस.आर.वट्टमवार,एच.बी.धूळगूंडे,एस.डी.भोंगे यांनी  भेट देऊन पाहणी केली.वस्तीलगत बिबट्या आल्याने नागरीकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कामगारानी घेतला फोटो

बिबट्या दिसतात  अंगावर शहारे उमटले आणि आपल्यावर हल्ला करील काय अशी मनात भीती निर्माण झाली असली तरी घाबरलेल्या अवस्थेत सफाई कामगार साईप्रसाद  चंद्रभान यांनी आपल्या मोबाईल कॅमे-यात बिबट्याचा फोटो  टिपला.
अन्नाच्या शोधात बिबट्या

तालुक्यात बिबट्या सह अन्य वन्यप्राण्याचा नेहमी वावर असतो.सध्या पावसामुळे जंगलात शिकार शोधणं कठीण झाल्याने  कच-याच्या ढिगा-यात मृत झालेल्या कोंबड्या,वराह,श्वान यासह  घाणकचरा असल्याने भुक भागवण्यासाठी अन्नाच्या शोधात बिबट्या आला असावा असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.

पिंजरा बसविण्याची मागणी 

शहरातील हनूमाननगर परिसरात बिबट्या आढळून आल्याने नागरिकात भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वनविभागानी कचरा डेपो जवळ पिंजरा बसवावा अशी मागणी केली आहे.
तालुक्यात सूधाप्रकल्पा लगत रेणापूर परिसरात बिबट्या असून तो तीथे आला असावा.आमचे कर्मचारी घटनास्थळी भेट देऊन ठशाची पाहणी केली पण पाऊस झाल्याने ठसे आढळून आले नाहीत. नागरीकांनी सावधगिरी बाळगली पून्हा दिसल्यावर त्वरित आमच्याशी संपर्क करावा.पिंजरा बसविण्याची मागणी केली असून त्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
( अंगद खटाणे:वनपरिक्षेत्र अधिकारी, भोकर)

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भोकरच्या कचरा डेपो वर बिबट्याचा वावर..! भोकरच्या कचरा डेपो वर बिबट्याचा वावर..!
आधुनिक केसरी न्यूज  भोकर : शहरातील हनूमाननगर परिसरात लगत नगरपरिषदेचा कचरा डेपो (डम्पिंग ग्राउंड) आहे. मंगळवारी ता. (आठ) पहाटेच्या सुमारास...
वेदांत बंडगर खुनातील संशयितांना 'मोक्का' एका अल्पवयीन मुलासह ९ जणांचा समावेश
चारित्र्यावर  संशय घेत, लोह्यात पतीचा पत्नीवर गोळीबार; पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा..!
भक्तिभावाचा सोहळा! तुळजाभवानी मातेच्या चरणी औसा येथील सावंत कुटुंबीयांकडून 'एक तोळा सोन्याचा हार' अर्पण
देगलूर पोलिसांची मोठी कारवाई: अवैध रेती वाहतूक करणारा हायवा जप्त, २०.४९ लाखांचा मुद्येमाल हस्तगत
देगलूरजवळ भीषण अपघात: दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली; तडखेल येथील २२ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर.
आषाढी वारी २०२६ – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा