लाख खरेदीसाठी गेलेल्या व्यवसायीकाचा खून ;गोरेगाव तालुक्यातील बोरगाव झुडपी-जंगल शिवारातील घटना 

लाख खरेदीसाठी गेलेल्या व्यवसायीकाचा खून ;गोरेगाव तालुक्यातील बोरगाव झुडपी-जंगल शिवारातील घटना 

आधुनिक केसरी न्यूज 

गोंदिया : 6 जून लाख खरेदीसाठी घरून गेलेल्या लाख व्यवसायीकाचा काठीने डोक्यावर चेहर्‍यावर वार करून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास गोरेगाव तालुक्यातील बोरगाव परिसरातील झुडपी-जंगल शिवरात उघडकीस आली. बाबूलाल दुलीचंद पटले (60) रा. बाघोली ता. गोरेगाव असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून गोरेगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बघोली येथील बाबूलाल पटले हे 5 जून रोजी सकाळी सुमारे 7 वाजता नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीने लाख खरेदीसाठी घरातून निघाले होते. मात्र, दुपारपर्यंत ते घरी परतले नाहीत. दरम्यान, गावातील नवरलाल सोनवणे यांनी पटले यांची मोटारसायकल बोरगाव शेतशिवार परिसरात उभी असल्याचे त्यांच्या नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. रात्री सुमारे 12.30 वाजताच्या सुमारास बोरगाव येथील झुडपी जंगल परिसरात, रस्त्यापासून अंदाजे 200 मीटर अंतरावर बाबूलाल पटले यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची पाहणी केली असता त्यांच्या चेहर्‍यावर, कानावर व डोक्यावर गंभीर जखमा असल्याचे दिसून आले. दरम्यान, अमित बाबूलाल पटले (30) रा. बघोली यांनी गोरेगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. तक्रारीवरून कुणीतरी अज्ञात व्यक्तीने काठीसारख्या वस्तूने मारहाण करून बाबूलाल पटले यांचा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच गोरेगावचे ठाणेदार चंद्रकांत काळे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठून पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. दरम्यान, गोरेगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत भुते करीत आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांसह इतरांच्या त्रासाला कंटाळून  शिक्षकांची दोन मुलासह नदीत कार घालून आत्महत्या  गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांसह इतरांच्या त्रासाला कंटाळून  शिक्षकांची दोन मुलासह नदीत कार घालून आत्महत्या 
आधुनिक केसरी  नांद : हिमायतनगर पोटेड पोटा येथील एका शिक्षक गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व कार्यालयातील कर्मचारी यांच्या कामगार कंटाला गोदावरी...
विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवारांच्या अल्टिमेटमपुढे प्रशासन नरमले
योजना पूर्ण करून शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मंदिर परिसरातील भू-संपादन अखेर यशस्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने दुकानदारांना मिळणार मालकी हक्काची जागा..!
‘लाडकी बहिण’ योजनेवर सत्तेतील सावत्र भावांचा ३५०० कोटी रुपयांचा दरोडा; सरकार आहे की दरोडेखोरांची टोळी : हर्षवर्धन सपकाळ
नामांकित कोचिंग क्लासेस संचालकाची आत्महत्या..!
महाबळेश्वरमध्ये भिगवणच्या तरुणाचा निघृण खून; चार आरोपींना बेड्या..!