प्रधानमंत्री मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; हंसराज अहीर यांचा सुरक्षा एस्कॉर्ट वाहन सोडण्याचा निर्णय

प्रधानमंत्री मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; हंसराज अहीर यांचा सुरक्षा एस्कॉर्ट वाहन सोडण्याचा निर्णय

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : इराण-अमेरिका-इस्राईल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने भारतातील पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या आयातीवर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला इंधन आणि गॅसचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. *या आवाहनाला माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर* यांनी त्वरित प्रतिसाद देत आपल्या सुरक्षा ताफ्यातील पोलिसांच्या एस्कॉर्ट वाहनाचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे.
हंसराज अहीर यांनी आज एका निवेदनात म्हटले आहे की, “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी दिलेल्या आवाहनाला प्रत्येक नागरिकाने प्रतिसाद द्यायला हवा. इंधन बचतीचा हा छोटासा प्रयत्न देशाच्या हितासाठी आहे. त्यामुळे मी माझ्या सुरक्षा ताफ्यातील एस्कॉर्ट वाहन न घेण्याचा निर्णय घेतला आहे. गरजेनुसारच वाहनांचा वापर करू.”सध्या इराण-इस्राईल- अमेरिका यांच्यातील तणावामुळे हर्मुझजची समुद्रधुनी आणि इतर प्रमुख मार्गांवर वाहतूक प्रभावित झाली आहे. त्यामुळे भारतासारख्या मोठ्या आयातदार देशाला कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याचा आणि पुरवठा कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या परिस्थितीत इंधन बचत हा एकमेव प्रभावी उपाय असल्याचे सरकारचे मत आहे.प्रधानमंत्री मोदी यांनी नुकत्याच केलेल्या आवाहनात जनतेला सार्वजनिक वाहतूक, अनावश्यक प्रवास टाळणे आणि घरगुती गॅसचा वापर जाणीवपूर्वक कमी करण्याचे आवाहन केले होते. हंसराज अहीर यांचा हा निर्णय या आवाहनाला मिळालेला पहिला ठळक प्रतिसाद मानला जात आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

घराचा स्लॅब भरताना तरुणाचा तोल जाऊन पडून मृत्यू; पैठण तालुक्यातील पाचोड येथील दुर्दैवी घटना घराचा स्लॅब भरताना तरुणाचा तोल जाऊन पडून मृत्यू; पैठण तालुक्यातील पाचोड येथील दुर्दैवी घटना
आधुनिक केसरी न्यूज  पाचोड : पैठण तालुक्यातील पाचोड येथे घराच्या स्लॅबचे काम सुरू असताना एका २४ वर्षीय तरुणाचा तोल जाऊन...
चंद्रपूर मनपा मध्ये गटनेता हटाव मोहीम तीव्र; काँग्रेसच्या दोन गटात धोबीपछाड
रॉयल लॉज वर पोलीसांचा छापा वेश्या व्यवसायाचा पर्दापाश
बोट उलटल्याने दोन तरुण बुडाले गोंदिया जिल्ह्यातील घटना
शेततळ्यात बुडून १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू ; अंबड तालुक्यातील माळेवाडी शिवारातील धक्कादायक घटना
पुरुषोत्तम पुरी येथे  गोदावरी नदीतील बोट दुर्घटनेत सिंदखेडराजा मतदारसंघातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू
आदरणीय दादांनी पक्षासाठी जे कार्य केले... जे योगदान दिले आणि जी निष्ठा दाखवली, ती कधीही विसरता येणार नाही : सुनेत्रा पवार