जन्मदाता बापच दोन चिमुकल्यांचा बनला मृत्यूदाता; संपूर्ण महाराष्ट्र हादरून सोडणारी जुन्नर तालुक्यात घडली घटना

जन्मदाता बापच दोन चिमुकल्यांचा बनला मृत्यूदाता; संपूर्ण महाराष्ट्र हादरून सोडणारी जुन्नर तालुक्यात घडली घटना

आधुनिक केसरी न्यूज 

नयन डुंबरे

आळेफाटा : ता. जुन्नर पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवरील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मोशी,ता.हवेली येथील २९ वर्षीय बाप सागर सदाशिव शिंदे याने आपल्याच ३वर्षीय मुलीचा आणि ५ वर्षीय मुलाचा गळा दाबून त्यांना आळेखिंडीच्या जंगलात फेकून दिले. या क्रूर कृत्यात चिमुकलीचा मृत्यू झाला, तर मुलगा बचावला असून तो मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे.  
   मंगळवारी रात्री सागर शिंदे याने आपली मुले हर्षदा वय ३ वर्ष आणि आर्यन वय ५ वर्ष यांना फिरायला घेऊन जात असल्याचे सांगून घरातून नेले. पुणे-नाशिक महामार्गाने नाशिककडे गेलेल्या सागरने रात्रीच्या सुमारास संतवाडी आळेखिंडी परिसरातील जंगलात येऊन दोन्ही मुलांचा गळा दाबला आणि त्यांना तिथेच फेकून दिले.  बुधवारी ६ मे रोजी सकाळी सागर पुन्हा मोशी येथील घरी परतला. आई-वडिलांनी मुले कुठे आहेत असे विचारले असता,त्याने चाकण येथे रूम घेतली असून मुले तिथेच आहेत असे खोटे सांगितले. त्यानंतर तो अंघोळ करून मुलांची कपडे घेऊन निघून गेला.दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी ५ वर्षीय आर्यन शुद्धीवर आला.तो रडत रडत महामार्गावर आला असता स्थानिक ग्रामस्थांच्या नजरेस पडला. ग्रामस्थांनी तातडीने वडगाव आनंद आणि आळे पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधला.पोलिसांनी आर्यनला आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये आणले.चौकशीत त्याने आपले नाव आर्यन सागर शिंदे असून तो मोशी येथील रहिवासी असल्याचे सांगितले. त्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ३वर्षीय हर्षदा हिचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी नातेवाईकांसह भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात  तक्रार दाखल केली.तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी सागर शिंदे याला चाकण येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मुलांना आळेखिंड येथील जंगलात गळा दाबून टाकल्याचे कबूल केले.आळेफाटा पोलिसांनी सागर शिंदे याला आळे घटनास्थळी आणले.बुधवारी रात्रीच्या वेळेस हर्षदाचा मृतदेह मिळून आला.सागर शिंदे यास अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर करत आहेत.या घटनेमुळे आळेफाटा परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.आरोपीवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भारतरत्न प्रस्तावाला विलंब का?  विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांचा एल्गार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भारतरत्न प्रस्तावाला विलंब का?  विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांचा एल्गार
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : दि.२३ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्याबाबत महाराष्ट्र विधानसभेत दिलेले आश्वासन अद्याप...
महिला व यूवकाचा अपघात मृत्यू; भोकर म्हैसा रस्त्यावरील घटना
काँग्रेस पक्षाचा आसुड मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला..!
काँग्रेसचा आसूड मोर्चा दुसऱ्या क्रांतीची नांदी ठरेल : सपकाळ
धानोरकरांचा बाऊन्सर वडेट्टीवरांनी हायकोर्टाद्वारे टोलवला..!
वकिली पेशाला दिली समाजकार्याची जोड; उद्योजक मानसिंग पवार यांचे गौरवउद्गार
‘स्वारातीम’ विद्यापीठाचा मोठा निर्णय; २४ महाविद्यालयांतील बी.एस्सी. प्रथम वर्ष प्रवेशाला स्थगिती