गुंजेवाहीच्या जंगलात वाघाचा भयानक हल्ला एकाच वेळी चार महिलांचा मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : दि. २२ जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात असलेल्या गुंजेवाहीच्या जंगलात वाघाने अतिशय भयानक हल्ला चढवत एकाचवेळी चार महिलांना ठार केले आहे. या घटनेने संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरून गेला असून परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुंजेवाही गावातील काही महिला नेहमीप्रमाणे जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या होत्या. सर्व महिला जंगलात एकत्रच तेंदूची पाने तोडत असताना, दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. या सर्व महिला जवळजवळ असल्याने वाघाने एकापाठोपाठ एक अशा चारही महिलांवर हल्ला करत त्यांना जागीच ठार केले.
चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहासात वन्यजीव संघर्षाच्या संदर्भात घडलेली ही पहिलीच अत्यंत दुर्दैवी आणि अंगाचा थरकाप उडविणारी घटना घडली आहे. दबा धरून बसलेल्या वाघाने एकाच वेळी चार महिलांवर हल्ला करत चौथींचाही बळी घेतला आहे. या हल्ल्यात सुनीता मोहुर्ले , कवडूबाई मोहुर्ले, अनुबाई मोहुर्ले, संगीता चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले आहे. पुढील तपास आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातील गावांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List