रोटाव्हेटरवर पडून शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

रोटाव्हेटरवर पडून शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

आधुनिक केसरी न्यूज 

नांदेड : लोहा तालुक्यातील नांदगाव येथील एक नववी पास शाळकरी विद्यार्थ्याचा रोटाव्हेटरवर पडून अपघातात गंभीर जखमी झाला होता, उपचारा दरम्यान त्याचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. माधव प्रकाश भरकडे (वय १५) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माधव हा शेजारील शेतात ट्रॅक्टरद्वारे रोटाव्हेटरने मशागत सुरू असताना पाहून तो तेथे गेला होता. यावेळी ट्रॅक्टरच्या मागील बाजूने चढण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा पाय घसरला आणि तो थेट रोटाव्हेटरवर पडला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला.  याच‌ वेळी‌ नातेवाईक व स्थानिक शेतकऱ्याने‌ उपचारासाठी धावाधाव करत नांदेड येथील एका खासगी‌ रुग्णालयात दाखल केले. मात्र दुर्दैवाने रात्री उशिरा उपचारा दरम्यान माधवचा‌ अखेर‌ मृत्यू झाला ‌, मृतदेहाची उत्तरीय तपासणी‌ ‌ नांदेड येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आली असून  बुधवारी (ता.२०) रोजी  मयत‌ माधव ‌भरकडे या विद्यार्थ्याच्या पार्थिवावर नांदगाव ‌ येथे  शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  विशेष म्हणजे हा मुलगा‌ आई-वडिलांस एकुलता एक लाडका‌‌ पुत्र‌ होता‌. मारतळा येथील श्री साईबाबा हायस्कूल मध्ये नुकताच नववी उत्तीर्ण झाला होता. त्याच्या पश्चात आई ,वडील व तीन बहिणी असा परिवार आहे. त्याच्या या अपघाती मृत्यूमुळे गाव परिसरातून हळहळ व्यक्त होत असून भरकडे‌  कुंटूबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

रोटाव्हेटरवर पडून शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू रोटाव्हेटरवर पडून शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : लोहा तालुक्यातील नांदगाव येथील एक नववी पास शाळकरी विद्यार्थ्याचा रोटाव्हेटरवर पडून अपघातात गंभीर जखमी झाला...
डॉ मोटेगावकर यांच्या क्लासेससह खाजगी कोचिंग क्लासेस अघोषित बंद 
बनायेंगे मंदिर या गुन्ह्यातून जिल्हा चिटणीस तथा कारसेवक किशोरसिंह चौहान यांच्यासह 12 आरोपींची निर्दोष मुक्तता
पोलिसांवर गोळीबार करून हल्लेखोर फरार; सोनेसांगवी परिसरात पोलिसांची मोठी शोधमोहीम
लोहा शहरातील लॉजवर पोलिसांचा धडक छापा; अनैतिक व्यवसायाविरोधात मोठी कारवाई
रामाळा तलाव स्वच्छतेसाठी शिवसेनेचा मनपा आयुक्तांना 24 तासांचा अल्टिमेटम 
चाकू हल्ल्यातील आरोपी अद्याप फरार