शेतकऱ्याच्या गोठ्याला आग अंदाजे चार लाखाचे नुकसान आल्फर येथील घटना
आधुनिक केसरी न्यूज
वरोडा : तालुक्यातील आल्फर येथील शेतशिवारात शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागल्याने एका बैलाचा मृत्यु तर जनावरांचा चारा व शेतीपयोगी अवजारे जळून खाक झाले.शेतकऱ्याचे जवळपास ४ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सदर घटना २०मे बुधवारला सकाळी १० .४५ वाजताचे दरम्यान घडली.
आल्फर येथील शेतकरी सुखदेव मारोती गराटे वय ७५ यांच्याकडे १० एकर शेती असून त्याच शेतात जनावरांसाठी व शेतीपोयोगी अवजारे ठेवण्यासाठी टीनाचा बंडा तयार केला होता.आगीची घटना घडली त्यावेळेस दोन बैल , चारा आणि ८० स्प्रिंकल पाईप बंड्यात ठेवले होते.आगीमध्ये दोन बैलांपैकी एका बैलाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे.स्प्रींकल पाईप पूर्ण जळून खाक झाले आहे. गोठ्याला आग लागल्याची बातमी पीडित शेतकऱ्याला शेतशिवारात असणाऱ्या लोकांनी दिली.तेव्हा सुखदेव गराटे शेतात गेले असता त्यांना सर्व साहित्याची राखरांगोळी झाल्याचे दृश्य दिसले. वरोडा नगरपरिषद चे अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. शेतकऱ्याचे जवळपास ४ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तलाठी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून त्यावेळेस गावातील पोलीस पाटील हजर होते.पशुवैद्यकीय अधिकारी सुद्धा उपस्थित झाले.
ऐन शेती हंगामातच दिड लाखाची बैल जोडी आगीच्या कवेत
शेतकऱ्याचा शेती हंगाम नुकताच सुरू होण्याच्या वेळेसच बैलजोडी आगीने कवेत घेतली.पीक कर्जामध्ये बैलजोडी घ्यावी की शेती करावी असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.प्रशासनाने पीडित शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List