सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी  

सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी  

आधुनिक केसरी न्यूज 

 महेश गायकवाड 

सोलापूर, दि०४ : सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे  दर्शन घेतले.यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे  व नगराध्यक्षा  प्रणिता भालके   यांनी जिल्हाधिकारी  कार्तिकेयन एस यांचा उपरणे व श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन सत्कार केला. यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले उपस्थित होते. 

कार्तिकेयन एस. हे भारतीय प्रशासकीय सेवेतील २०२० बॅच  चे (आय. ए. एस.) महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. ते यापूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी पंढरपूर येथे भेट देऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली  सुरू असून, सदर कामाची माहिती कार्तिकेयन एस. यांनी घेतली. यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या व करण्यात आलेल्या कामांची माहिती यावेळी दिली. यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीने नवनियुक्त जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

गॅस टँकरमधून अवैधरीत्या गॅसची चोरी; पुरवठा विभागाची टोळीवर कारवाई; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त गॅस टँकरमधून अवैधरीत्या गॅसची चोरी; पुरवठा विभागाची टोळीवर कारवाई; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त
आधुनिक केसरी न्यूज  ​छत्रपती संभाजीनगर : मा. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई श्री. चंद्रकांत डांगे आणि जिल्हा पुरवठा...
सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी  
रेतीने भरलेल्या टिप्पर ने महिलेला उडविले  महिलेचा घटनास्थळीच मृत्यू तर नाबालिका गंभीर 
चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदी वसुमना पंत रुजू ; शुक्रवारी स्वीकारली पदाची सूत्रे
चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदावर प्रथमच महिला विराजमान होणार वसूमना पंत यांची नियुक्ती 
चंद्रपूर जिल्ह्यासाठी 1 व 3 एप्रिल रोजी येलो अलर्ट तर 2 एप्रिल ला ऑरेंज अलर्ट
नाशिक–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पुन्हा भीषण अपघात मद्यधुंद; कंटेनर चालकाकडून दोन वाहनांना धडक, तिघे जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक