नाशिक–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पुन्हा भीषण अपघात मद्यधुंद; कंटेनर चालकाकडून दोन वाहनांना धडक, तिघे जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक

नाशिक–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पुन्हा भीषण अपघात मद्यधुंद; कंटेनर चालकाकडून दोन वाहनांना धडक, तिघे जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक

आधुनिक केसरी न्यूज 

जनार्दन चव्हाण 

विंचूर (ता. निफाड) : नाशिक–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून आज पुन्हा एक भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कंटेनर चालकाने दोन वाहनांना जोरदार धडक दिल्याने तिघेजण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

ही घटना दुपारी साधारण २ वाजून ३ मिनिटांच्या सुमारास विंचूर नाशिक मार्गांवरील  खांदोडे वस्ती परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, विंचूरकडून नाशिकच्या दिशेने जाणारी एक स्कोर्पिओ कार व एक मोटारसायकल मार्गावरून जात असताना, समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने अचानक नियंत्रण गमावून दोन्ही वाहनांना जोरदार धडक दिली.

अपघाताचा धक्का इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवले.जखमींपैकी दुचाकीस्वार याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते, तर उर्वरित दोघांवर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.दरम्यान, संबंधित कंटेनर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.महामार्गावरील सुरू असलेली कामे, बेदरकार वाहनचालक आणि नियमांचे उल्लंघन यामुळे अशा अपघातांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सगरोळी येथे ओव्हरलोड  रेतीच्या हायवाखाली चिरडून एकाचा मृत्यू ;स्थानिक नागरीकांचा प्रशासना विरुद्ध प्रचंड संताप सगरोळी येथे ओव्हरलोड  रेतीच्या हायवाखाली चिरडून एकाचा मृत्यू ;स्थानिक नागरीकांचा प्रशासना विरुद्ध प्रचंड संताप
आधुनिक केसरी न्यूज  बिलोली : देगलूर–बोधन मार्गावर सगरोळी येथे भरधाव व ओव्हरलोड रेती वाहतूक करणाऱ्या हायव्याने एका व्यक्तीला चिरडल्याची धक्कादायक...
बीएसएफ जवानाने थेट पिस्तूल काढून गोळीबार केला, एका व्यक्तीच्या हनुवटीला लागली गोळी
‘NEET’ पेपरफुटी प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे भाजपा सरकारविरोधात तीव्र आंदोलन
प्रधानमंत्री मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; हंसराज अहीर यांचा सुरक्षा एस्कॉर्ट वाहन सोडण्याचा निर्णय
तेंदु पत्ता संकलन करणाऱ्या मजुरावर अस्वलाचा हल्ला गंभीर जखमी
अपघातग्रस्त ट्रकमुळे ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; रस्त्याच्या कडेला उलटून एका प्रवाशाचा मृत्यू, दहा जखमी 
साईलाला गँगच्या १२ सदस्यांवर मकोका अंतर्गत कारवाई