श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती तर्फे चंद्रपूर महानगरात भव्य रामनवमी शोभायात्रा उत्सव
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : 25/3./2026 चंद्रपूर श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती तर्फे उद्या गुरुवार दि. २६ मार्च ला रामनवमी उत्सव सोहळा महानगर परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने भव्य शोभायात्रा काढण्यात येत असून मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी होणार आहेत.रामनवमी निमित्त सायंकाळी ठीक ५ वाजता काळाराम मंदिर, समाधी वार्ड येथून भव्य शोभायात्रेचे सुरुवात होईल. शोभायात्रा गांधी चौक, जटपुरा गेट, कस्तुरबा रोड, ते गिरनार चौक पासून परत काळाराम मंदिर पर्यंत पोहोचणार आहे. या दरम्यान विविध ठिकाणी भगवान रामाच्या जीवनावर आधारित प्रसंगाचे देखावे, झांकी प्रदर्शन होणार आहे. काळाराम मंदिर ते जटपुरा व कस्तुरबा रोड मार्गे गिरनार चौक व समाधी वार्ड पर्यंत शंभर स्वागत द्वार लावण्यात येणार आहे. आयोजकांतर्फे पंचरा हजार भगव्या झेंड्यांचे वितरण करण्यात येत आहे. ठिकठिकाणी शोभायात्रेतील सहभागींकरिता विविध सामाजिक सेवा संस्थांकडून विविध सेवा स्टॉल असणार आहेत. मागील वषपिक्षा यावर्षी भाविकांनी रस्त्यावर स्वागत व्दार आणि शोभायात्रेच्या मार्गावर भावीकांसाठी विभीन्न सामाजीक संस्था स्वतः हुन महाप्रसाद, पाणि व शरबत वाटप करणार आहे. त्याकरीता चंद्रपूर शहराच्या आजू-बाजूचे ग्रामीण परिसरातील श्रीराम भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. शोभायात्रेची सांगता महाप्रसाद वितरीत करुन काळाराम मंदिर येथे होणार आहे.
या शोभायात्रेत सहभागी होण्याकरिता कार्यकारिणी समिती अध्यक्ष शैलेश बागला, कार्याध्यक्ष रोडमल गहलोत, उपाध्यक्ष घनश्याम सिंग दरबार, सचिव विजय ऐंगलवार, कोषाध्यक्ष सुधीर टिकेकर, सहसचिव राजगोपाल तोष्णीवाल, अजय वैरागडे, डॉ. अशोक जीवतोडे, रामजीवन परमार, मधुसूदन संगठा, राणा डलके, अरुण तीखे, मुग्धा खांडे, पंकज शर्मा, रामकिशोर सारडा, आशिष मुंधडा, योगेश भंडारी, अजय जयस्वाल, सुधीर धकाते यांनी केले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List