मोटारसायकलच्या संशयास्पद आगीने तर्कवितर्क; इदगाह मैदानापासून हाकेच्या अंतरावर घटना
आधुनिक केसरी न्यूज
नांदेड : येथील इदगाह मैदानापासून हाकेच्या अंतरावर एका संशयास्पद मोटारसायकल मध्ये स्फोट झाला असून सदर स्फोटामुळे वेगवेगळे तर्कवितर्क काढण्यात येत आहेत. घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा जमा झाला असून आगीची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान मोटारसायकल चालकांचा या आगीत मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नांदेड येथील देगलूर नाका येथील इदगाह मैदानावर ईदची नमाज असून वाजेगाव ते इदगाह मैदानाकडे जाणारे रस्त्यावर एका मोटारसायकल अचानक आग लागली. मोटारसायकलला लागलेल्या आगीत स्फोटाचे मोठे आवाज होत होते. आगीच्या ज्वाळा मध्ये मोटारसायकल चालक ९० टक्के भाजला आहे. सदरील आगीत मोठ्या प्रमाणात स्फोट झाल्याचे अपघातातील व्हिडिओ क्लिप वरुन दिसून येत होते.
सदर घटनेची माहिती ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांना समजताच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सदर घटनेची दखल घेतली असून चौकशी सुरू झाली आहे. घटनास्थळाला पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. दरम्यान सदर घटनेतील मोटारसायकल हा ९० टक्के भाजला असून वैद्यकीय उपचारासाठी त्यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांचा या घटनेत मृत्यू झाला असल्याची चर्चा सुरू आहे. नांदेड पोलिसांनी मोटारसायकलच्या संशयास्पद आगीची गंभीर दखल घेतली असून सर्व दृष्टीने त्यांची चौकशी करण्यात येत आहे. घटनास्थळी पोलिस अधिकारी तसेच दहशतवाद विरोधी पथकाने भेट देऊन पाहणी केली. विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप व पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्व पोलिस अधिकारी इतवारा पोलिस ठाण्याच्या उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. सदर घटनेची माहिती गोळा करत आहेत.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List